News34 chandrapur गुरू गुरनुले
मूल - ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील नव्याने निर्माण केलेल्या सोमनाथ देवस्थानच्या जवळ पर्यटकांसाठी वनविभागाने सफारी गेट उभारले आहे, सफारी गेटचे काम पुर्ण होवुन जवळपास महिना लोटला मात्र अजुनही उद्घाटन झाले नाही, यामुळे पर्यटकांना उद्घघाटनाची उत्सुकता लागली आहे. Tadoba safari
वाघाच्या दर्शनासाठी पर्यटकांची वाढती पर्यटकसंख्या लक्षात घेता शासनाने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात नविन अनेक सफारी गेट तयार करण्यास मंजुरी दिली होती, त्यानुसार मूल तालुक्यातील बफर क्षेत्रातील सोमनाथ देवस्थान मंदीराजवळ सफारी गेट उभारण्यात आले असून सदर सफारी गेटचे काम मूल येथील वनपरिक्षेत्राधिकारी घनश्याम नायगमकर यांच्या नेतृत्वात पुर्ण करण्यात आले आहे. News Safari gate
चंद्रपूर जिल्हा हा वाघाचा tiger जिल्हा म्हणुन संपुर्ण महाराष्ट्रात ओळख आहे, वाघ पाहण्यासाठी सेलिब्रीटी celebrity आणि हिवाळी अधिवेशनाच्या प्रसंगी राजकीय नेते, मंत्री नेहमीच चंद्रपूर जिल्हात येत असतात, करोडो रुपयाचा निधी ताडोबा पर्यटकांकडुन शासनाला मिळत असतो, आणलाईन बुकिंग आहे. तरीही अनेक पर्यटकांना बुकींग 'फुल' राहात असल्याने त्यांना वाघ बघण्याचा आनंद घेता येत नाही, यामुळे पर्यटकांची वाढती संख्या बघता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये नविन अनेक सफारी गेटला मंजुरी दिली आहे, त्यानुसार सोमनाथ येथील सफारी गेटचे काम पूर्ण करण्यात आले आहे मात्र सदर सफारी गेट सुरु करण्याबाबत ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे गेट सुरु करण्याबाबत अजूनही आदेश प्राप्त झालेले नाही. अधिकाऱ्यांचे आदेश प्राप्त होताच सोमनाथ सफारी गेट सुरु करण्यात येईल अशी प्रतिक्रिया मुल वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम नायगंमकर यांनी दिली आहे.