News34 chandrapur
मुंबई/चंद्रपूर - कांग्रेस पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला असून कांग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा देत कांग्रेस पक्षात राजकीय भूकंप घडविला.
Congress maharashtra
Congress maharashtra
विशेष म्हणजे आजच थोरात यांचा वाढदिवस असून त्यांनी यादिवशी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
सत्यजित तांबे यांना नाशिक पदवीधर मतदार संघाची उमेदवारी न दिल्याने ते नाराज झाले होते, थोरात यांनी पटोले विरोधात कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे तक्रार केली होती. Balasaheb thorat
तक्रारीच्या त्या पत्रात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पक्षात मनमानी कारभार सुरू असल्याचा उल्लेख केल्या गेला होता.
आता पटोले सोबत काम करणे अशक्य असल्याचे त्या पत्रात नमूद केले आहे. Nana patole
नाशिकच्या पदवीधर निवडणुकीत थोरात यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी काम केलं नसल्याचा ठपका ठेवण्यात आला होता, विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आम्ही पटोले यांच्या बाजूला असल्याचे उघडपणे स्पष्ट केले आहे.
थोरात यांचा राजीनामा पक्षश्रेष्ठींनी स्वीकारला नसल्याची माहिती आहे.
कांग्रेस हायकमांडचे कांग्रेस पक्षात सुरू असलेल्या गतबाजीवर पूर्ण लक्ष आहे, आतापर्यंत थोरात यांनी माझ्याशी कसलाही सम्पर्क केला नसल्याचे पटोले यांनी सांगितले.