News34 chandrapur
चंद्रपूर : हल्ली चंद्रपुरात नाईट लाईफचे एक वेगळे फॅड तयार होऊ लागले आहे. प्रशासनाच्या आशीर्वादाने याला खतपाणी मिळत आहे. काही अधिकाऱ्यांनी साटेलोटे करून मध्यरात्रीपर्यंत सर्रास बार आणि पानटपऱ्या सुरू असतात. मात्र ही नाईटलाईफ चंद्रपुरकरांसाठी एक जीवघेणी समस्या बनत चालली आहे. काही दिवसांपूर्वी जटपुरा गेटजवळ मध्यरात्री सुरू असलेल्या इटनकर पानटपरीजवळ कार अपघातात दादू ढोले या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
या घटनेच्या अवघ्या दीड महिन्यानंतर मध्यरात्री सुरू असलेल्या एनडी बार मधून मद्यधुंद अवस्थेत निघणाऱ्या दोन आरोपींनी आपल्या दोन वेगवेगळ्या कारने पार्किंग मध्ये पडलेल्या मद्यपी युवकावर कार चढवली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. 5 फेब्रुवारीला रात्री दीड वाजेपर्यंत हे बार सुरू होते. आरोपी इतके दारू प्यायले होते की एक माणूस त्यांच्या गाडीखाली येतोय याचे भानही त्यांना उरले नाही. ह्या घटनेत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस तपास करीत आहे. मात्र ह्या बेकायदेशीर नाईटलाइफमुळे निर्माण झालेल्या समस्येकडे प्रशासन अद्यापही गंभीर नसल्याचे या माध्यमातून दिसून येत आहे. Night life chandrapur
या घटनेच्या अवघ्या दीड महिन्यानंतर मध्यरात्री सुरू असलेल्या एनडी बार मधून मद्यधुंद अवस्थेत निघणाऱ्या दोन आरोपींनी आपल्या दोन वेगवेगळ्या कारने पार्किंग मध्ये पडलेल्या मद्यपी युवकावर कार चढवली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. 5 फेब्रुवारीला रात्री दीड वाजेपर्यंत हे बार सुरू होते. आरोपी इतके दारू प्यायले होते की एक माणूस त्यांच्या गाडीखाली येतोय याचे भानही त्यांना उरले नाही. ह्या घटनेत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस तपास करीत आहे. मात्र ह्या बेकायदेशीर नाईटलाइफमुळे निर्माण झालेल्या समस्येकडे प्रशासन अद्यापही गंभीर नसल्याचे या माध्यमातून दिसून येत आहे. Night life chandrapur
काय आहे प्रकरण?
5 फेब्रुवारीला मृतक उमंग नीलकंठ दहिवले हा
रघुवंशी कॉम्प्लेक्स मधील एनडी रेस्ट्रोबार मध्ये गेला येथेच्छ दारु पिली. दारू जास्त झाल्यावर तो पार्किंग मध्येच झोपला. याच बारमध्ये जिग्नेश गोपाल विराणी, प्रतीक वाभीटकर मद्यसेवन करीत होते. तिथून बाहेर पडल्यानंतर या दोघांनाही धड चालता येत नव्हते. प्रतीक याची गाडी पार्किंगमधून 1 वाजून 36 मिनिटाने गेली. त्याने थेट उमंग यांच्या अंगावरून गाडी नेली. यानंतर त्याने गाडी थांबवून खाली उतरून बघितले, मात्र त्याला उपचारासाठी नेण्याऐवजी त्यांनी त्याला बाजूला करत पोबारा केला. यानंतर काही वेळातच जिग्नेश विराणी यानी देखील थेट त्याच्या धडावरून गाडी चालवली. मात्र तोही थांबला नाही आणि त्याने पळ काढला. रात्री दीड वाजताची ही घटना आहे. कोणीही मदतीला न आल्याने उमंग दहिवले याचा उपचाराअभावी मृत्यू झाला. यानंतर शहर पोलिसांनी तब्बल 24 तासानंतर गोपाल विराणी, प्रतीक वाभीटकरला अटक केली. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहे. त्यांनी दारुसोबत अंमली पदार्थ देखील सेवन केले असण्याची चर्चा आहे. मात्र, नमूने पाठवण्यात उशीर झाला त्यामुळे यात दारू आणि अंमलीपदार्थांचे अंश आढळून येणार का याबाबत साशंकता आहे. सध्या त्यांची न्यायालयिन कोठडीत रवानगी केली असून जामीनासाठी त्यांनी अर्ज केल्याची माहिती आहे.
ND Bar chandrapur
एनडी रेस्ट्रो बारला नेमकी कुणाची सूट?
एनडी रेस्ट्रो बार सुरू होण्यावरच अनेक प्रश्नचिन्ह आहेत. नियमाप्रमाणे अकरा वाजता बार बंद करायचा असतो. परंतु या बारला पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाकडून विशेष परवानगी मिळाली आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो. कारण हा बार नेहमी 12 वाजल्यानंतर देखील सर्रासपणे सूर असतो. या बारच मालक निकुंज हासानी आहे. तो प्रशासनाच्या नाकावर टीचून रात्रभर बार चालवत होता. त्याचाच परिणाम एकाचा बळी जाण्यात झाला. या बारमध्ये अल्पवयीन मुले आणि मुलीसुद्धा मद्यप्राशन करण्यासाठी जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एनडी बारला नेमका कुणाचा वरदहस्त आहे, यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. Raghuvanshi complex chandrapur
उत्पादन शुल्क विभागाची डोळेझाक
हा बार मध्यरात्रीपर्यंत सुरू असल्याचे या घटनेच्या माध्यमातून समोर आले. हा नियम मोडल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने कुठलीही कारवाई केली नाही. खरं तर उत्पादन शुल्क विभागाने या माध्यमातून या घटनेपूर्वीची दररोजची सीसीटीव्ही फुटेज तपासायला हवी आणि त्यासंदर्भात कठोर कारवाई करायला हवी. मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांच्याशी वारंवार संपर्क केला असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.
मालक निकुंज हासानी याची अद्याप चौकशी नाही
या प्रकरणात एनडी बारचा मालक निकुंज हासानी याची चौकशी होणार असे पोलिसांकडून सांगितले जात होते. चार दिवस उलटूनही अद्याप हासानीची पोलिसांनी चौकशी केली नाही. याबाबत हासानी याच्याशी संपर्क केला पोलिसांकडून अशी कुठलीही सूचना आपल्याला मिळालेली नाही असे सांगितले.
Chandrapur crime
आम्ही नियमांचे पालन करतो : हासानी
मध्यरात्रीपर्यंत हे बार सर्रासपणे सुरू असण्याबाबत निकुंज हासानी याच्याशी संपर्क केला असता आपले बार हे नियमाप्रमाणे 11.30 पर्यंत सुरू असते मात्र ग्राहकांमुळे थोडा वेळ होतो असे सांगितले. मात्र घटनेच्या दिवशी हे बार दीड वाजेपर्यंत सुरू असल्याचे समजते, त्यापूर्वी देखील हे बार याच वेळेपर्यंत सुरू असल्याची तक्रार आहे, त्यामुळे याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
Chandrapur news
नाईट लाईफच्या समस्येवर स्थिती जैसे थे
रात्रभर सुरू असलेले बार आणि पानटपऱ्या या नाईटलाईफमुळे मोठी सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. अनेक जण यावर चिंता व्यक्त करीत आहे. पोलीस विभागाची रात्री गस्त घातली जाते. मात्र ही गस्त कधी येणार, आता कुठे आहे, किती वेळात आपल्या पर्यंत पोचणार याची खडानखडा माहिती बार, टपरीचालकाला मिळते कारण यंत्रणेत असलेले कर्मचारी याची माहिती देतात. त्यांचे साटेलोटे यात निर्माण झाले आहेत. त्यामुळे या गस्तीचा काहीच परिणाम यावर होत नाही. त्यामुळे या नाईटलाईफमुळे निर्माण झालेल्या समस्येवर पोलीस विभाग आणखी काही कठोर पाऊले उचलणार काय याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सुरू असलेली यंत्रणा कायम राहील आणि जो नियम मोडेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया दिली.
विशेष म्हणजे आजही जटपुरा गेट परिसर व रेल्वे स्टेशन परिसरात पान टपऱ्या ह्या मध्यरात्री 2 ते 3 वाजेपर्यंत सर्रासपणे सुरू असतात.
एनडी बारचा परवाना रद्द करा : देशमुख
एनडी रेस्ट्रो बार नियम डावलून रात्री ३ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येते. या बारमध्ये अल्पवयीन मुला-मुलींना प्रवेश देण्यात येतो अशा अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत.या बारमध्ये मारहाणीच्या गंभीर घटना घडल्या आहेत. मात्र पोलीस विभागाकडून कारवाई करण्यास नेहमी टाळाटाळ करण्यात येते. या बारला परवाना देताना नियम डावलण्यात आले. त्यामुळे या बारचा परवाना रद्द करण्यात यावा. दारू दुकान वाटप करताना मोठा गैरव्यवहार झाला असून या गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी जनविकास सेनेचे अध्यक्ष, माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.