News34 chandrapur गुरू गुरनुले
मुल - 2017 पासून सितांगन अॅग्रो प्रोड्यूसर कंपनी लि. मारोडा शेतक-यांच्या हितार्थ कार्य करीत आहे. कंपनीचे संचालक तथा 500 भागधारक सभासद सक्रिय सहभाग देत आहेत. दि.16/2/2023 ला विनय गौडा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी कंपनीच्या प्रकल्पस्थळी आकस्मिक भेट दिली.
याप्रसंगी कंपनीचे वतीने गुलाब पुष्प, ब्लॅक व ग्रिन राईस भेट देवून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कंपनीचे अध्यक्ष प्रकाश खोब्रागडे यांनी कंपनीच्या विवीध उपक्रमांबाबत सर्विस्तर माहिती दिली. कंपनीचे सिड क्लिनींग आणि ग्रेडींग प्रकल्प शेतक-याच्या सेवेत रुजू झाला असून 400 मेट्रिक टन साठवण क्षमतेच्या गोडाऊनचे काम पूर्ण झाले आहे. या भेटीत जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष बांधावर करडी (Safflower) पिकाची पाहणी केली आणि कंपनीच्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी यांचे समवेत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, सहसंचालक आत्मा रविंद्रजी मनोहरे, डाॅ.होळी तहसिलदार मूल भाष्कर गायकवाड ता कृ अ. मूल, तिजारे कृ.अ.मूल तथा ता.कृ.कार्यालय मूल येथिल ऊईके, कुंभारे कृ.प. कार्यालयीन कर्मचारी, कृ.सहाय्यक, बिटीएम यांचा सहभाग होता. याप्रसंगी कंपनीचे संचालक प्रा.राजेश्वर राजूरकर, सुधाकर चौधरी इत्यादीं उपस्थित होते.