News34 chandrapur
चंद्रपूर - सावली तालुक्यातील ग्रामखेड्यांची शुद्ध पेयजल समस्या कायमस्वरूपी मिटणार आहे. तालुक्यातील 48 गावांना माजी मंत्री तथा आ. विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत अंदाजे 90 कोटींच्या विकास कामांना मंजुरी मिळाली असून त्यापैकी 21 गावांना नळ योजनेचे कामाचे कार्यारंभ आदेश प्राप्त झाले आहे. Pure water
Water Life Mission Program
महाविकास आघाडी सरकारच्या काळात सलग दोन वर्षे कोरोना या वैश्विक महामारीमुळे संपूर्ण जग हैराण झाले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत राज्याची आपत्ती व्यवस्थापनाची सूत्रे सांभाळणारे मंत्री तथा आ. विजय वडेट्टीवार यांनी जीवाची परवा न करता राज्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. कोरोना संकट टाळण्यासोबतच विकास कामांवर भरही दिला. अशाच विकास कामांपैकी एक असलेल्या ब्रह्मपुरी मतदार संघातील सावली तालुक्यातील एकूण 48 गावांना दूषित पाणी पुरवठ्यामुळे आरोग्य जपने कठीण जात असल्याची समस्या वर्षानुवर्षांपासून भेडसावत होती या गंभीर समस्येच्या निराकारणाकरिता माजी मंत्री वडेट्टीवार यांनी पुढाकार घेऊन त्या 48 गावांना शुद्ध पेयजल मिळावे याकरिता विशेष पाठपुराव्यातून 90 कोटीं निधीची मंजुरी मिळवून दिली. Ex cabinet minister vijay wadettiwar
जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत प्रस्तावित असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेमधे बोरमाळा, डोनाळा, विहीरगाव, आकापूर, जनकापुर (तुकूम) सिंगापूर, खानबाद (चक) सावंगी(दीक्षित) उमरी, थेरगाव ,सायखेडा, गेवरा (खुर्द) डोंगरगाव (मस्के) मेहा (बुज) बेलगाव, जांम (बुज) कडोली, उसेगाव, गायडोंगरी, करोली कसरगाव यासह एकूण 48 गावांचा समावेश आहे. माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांचा विकासात्मक दृष्टिकोन व नागरिकांप्रति असलेली सद्भावना तसेच दीर्घ अनुभवातून मतदारसंघातील ग्राम खेड्यातील समस्या जाणून घेत शासन स्तरावर मंजूर करून घेतलेल्या सदर नळ योजना कामामुळे हजारो नागरिकांच्या शुद्ध पेजलाची समस्या कायमस्वरूपी मिटणार आहे त्यामुळे सावली तालुक्यातील नागरिकांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.