News34 chandrapur
विरुर - धावत्या रेल्वेतून एक युवक सकाळी खाली सदर माहिती विरुर पोलिसांना मिळाली असता त्यांनी तात्काळ त्याठिकाणी सहायक पोलिस निरीक्षक जयप्रकाश निर्मल व पोलीस चमू पोहचले.
दक्षिण मध्य रेल्वे लाईनच्या पोल क्रमांक 157/21 जवळील रेल्वे ट्रॅक जवळ तो इसम पडला होता, पोलिसांनी त्याला उचलले मात्र पुढील मार्ग खडतर व काटेरी स्वरूपाचा असल्याने त्यांनी कशाचीही तमा न बाळगता त्या खडतर मार्गाचं आवाहन स्वीकारत जखमी युवकाला बाहेर काढले.
ट्रॅकटर च्या मदतीने विरुर जवळ जखमी युवकाला आणत तिथून रुग्णवाहिकेने राजुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. Chandrapur railway track
विरुर पोलिसांनी याबाबत अधिक चौकशी केली असता तो युवक बिहार राज्यातील मुज्जफरनगर येथील सिमरा नयानपुर येथील रहिवासी 31 वर्षीय रमनकुमार बिंदेश्वर प्रसाद प्रताप सिंग महतो असल्याचे कळले.
पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांची माहिती काढत याबाबत त्यांना सूचित करण्यात आले, सदर युवक हा मानसिक रोगी असल्याचे पोलीसांना कुटुंबीयांनी सांगितले. Chandrapur police
सध्या त्या युवकांवर चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
सहायक पोलिस निरीक्षक जयप्रकाश निर्मल यांच्या समयसुचकते मुळे एका युवकाला वेळीच उपचार मिळाल्याने विरुर वासीयांनी निर्मल, मल्लेश नारगेवार, प्रहलाद जाधव
यांचे कौतुक केले.