News34 chandrapur
चंद्रपूर - शहरातील नागरिकांना पोलीस विभागातील विविध विषयांची माहिती व्हावी यासाठी चंद्रपूर पोलीस दलातील पोलीस निरीक्षक लता वाढीवे यांनी महाकाली पोलीस चौकीमध्ये परिसरातील नागरिकांनी एक जागरूक नागरिक बनत पोलीस प्रशासनाची विविध माध्यमातून मदत कशी करता येईल याबाबत मार्गदर्शन केले.
Chandrapur police
चंद्रपुरातील नागरिकांनी आपल्या भागात होणाऱ्या गुन्हेगारी कृत्यांवर लक्ष ठेवत त्याची माहिती पोलीस प्रशासनाला द्यावी, सध्या चंद्रपूर पोलिसांच्या वतीने जेष्ठ नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी, सायबर गुन्हेगारी याबाबत जनजागृती केल्या जात आहे. Awareness
गुड टच बॅड टच, पोलीस मित्र, एकटे राहणारे जेष्ठ नागरिक, सायबर गुन्हेगारीला बळी पडणारे विद्यार्थी, छेडछाडीच्या घटना यावर आळा कसा घालता येईल याबाबत पोलीस निरीक्षक लता वाढीवे मार्गदर्शन करीत आहे.
शहरातील महाकाली पोलीस चौकीत कम्युनिटी पोलिसिंग बाबत नागरिकांना माहिती देण्यात आली, यावेळी पोलीस उपनिरीक्षक विजय मुक्के, संजय धोटे उपस्थित होते.