News34 chandrapur
नागभीड/चंद्रपूर - वर्ष 2015 मध्ये हिंगणघाट येथील युवकाला I LOVE YOU म्हणणे खूप महागात पडले, त्या युवकाला न्यायालयाने तब्बल 3 वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
12 नोव्हेंबर 2015 मध्ये आरोपी श्रीकांत तडस रा.मुरपार तालुका हिंगणघाट याने नागभीड येथील अल्पवयीन मुलीचा फोटो मोबाईल वर व्हाट्सएप स्टेट्स वर ठेवत, I love you so much my lovely असे लिहत शेरेबाजी केली.
यावर अल्पवयीन मुलीच्या भावाने नागभीड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. पोलिसांनी 354, पोक्सो अंतर्गत तडस वर गुन्हा दाखल केला.
भावाच्या तक्रारीनंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक बारीकराव मडावी यांनी तपास करीत आरोपी तडस विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सदर प्रकरणांची न्यायालयात 8 वर्षे सुनावणी सुरू होती, 10 जानेवारी 2023 ला याप्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश दीक्षित यांनी निकाल दिला.
याप्रकरणी 8 साक्षीदार तपासून आरोपी श्रीकांत तडस ला पोक्सो व कलम 354 अ (1)(4) सहकलम 12 अंतर्गत दोषी ठरवीत 3 वर्षाची शिक्षा, दंड व माहिती तंत्रज्ञान कायद्यांव्ये 1 वर्षाची शिक्षा, दंड न भरल्यास 3 महिने शिक्षा सुनावण्यात आली.
सरकारी पक्षातर्फे अधिवक्ता संदीप नागापुरे, स्वाती देशपांडे यांनी काम बघितले तर कोर्ट पैरवी पोलीस कर्मचारी दिनकर दिनकर गौरकर नागभीड यांनी काम बघितले.
