News34 chandrapur
चंद्रपूर : दिनांक 15/1/2023 ला चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरात रात्रीं 09:30 दरम्यान अचानक जमीन हलल्याने संपूर्ण शहरात भिती चे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून कुठलेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही नुसता चाल ढकलपना सुरू आहे पालकमंत्री म्हणतात चौकशी करा जीएसआय अधिकारी म्हणतात भूकंप नाही आपत्ती व्यवस्थापन म्हणतात भूगर्भात काही घडले असेल डब्लू सी एल स्पष्टीकरण देते ब्लास्टिंग केली नाही. Aam Aadmi Party
Chandrapur latest news
या परिसरात डब्लू सी एल च्या खाणी मोठ्या प्रमाणात असून एखादा स्फोट घडून आणला असावा यासंदर्भात सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न केल्यानंतरही प्रशासनाकडून कुठलेही ठोस कारण पुढे न आल्याने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. Wcl coal mine
या परिसरामधील लालपेठ येथे ओपन कास्ट खदान चे काम सुरू असल्याने तेथे दुपारच्या वेळेला बारुद लावून स्फोट घडवून आणत असतात, बहुतांश लोकांना हा स्फोट डब्ल्यूसीएलच्या माध्यमातून घडवून आणला असावा तर अनेकांच्या मनामध्ये हा भूकंप तर नसावा अशा संशयाने अनेकांची रात्र ही जागण्यात गेली. Earthquake
दुसऱ्या दिवशी या प्रकरणावरती प्रशासनाने आपली कोणतीही भूमिका न बजावल्याने आम आदमी पार्टीच्या वतीने संबंधित डब्ल्यूसीएलच्या क्षेत्रीय महाप्रबंधक यांना निवेदनातून पाच दिवसात या स्फोटाचा खुलासा करावा किंवा हा प्रकार कशामुळे घडला याची संपूर्ण माहिती चंद्रपूर जनते समोर ठेवावी, अन्यथा आम आदमी पार्टी तर्फे परिसरातील लोकांना सोबत घेऊन क्षेत्रिय महाप्रबंधकाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करू. असे आवाहन आपचे शहर सचिव राजू कुडे यांनी प्रशासनाला केले आहे. यावेळेला आपचे जिल्हा अध्यक्ष सुनील मुसळे, युवा जिल्हा अध्यक्ष मयूर भाऊ राईकवार, शहर सचिव राजू कुडे, अध्यक्ष संतोष बोपचे, झोन अध्यक्ष रहमान खान पठाण, प्रभाग अध्यक्ष अनुप तेलतुंबडे, भिमराज बागेसर, कोमल कांबळे, अजय बाथब इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.