News34 chandrapur
वरोरा : वाघाच्या ठश्याचे फोटो काढत असताना अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने दोन व्यक्तींवर झेप घेतल्याने दोघांनी पळून जात जीव वाचविण्यासाठी नदीच्या पाण्यात उडी घेतली. यामुळे थोडक्यात दोन व्यक्तींचे प्राण बचावले. माढेळी जवळील वडगाव शेतशिवारात ही घटना घडली.
Tiger attack
वरोरा तालुक्यातील माढेळी या गावा जवळच असलेल्या वडगाव या गावाच्या शिवारामध्ये हरिदास तुरणकर यांच्या शेतशिवारात गायी गुरे चरत होते. दरम्यान गायीवर हल्ला करण्यासाठी एक पट्टेदार वाघ दबा धरून बसला असल्याचे दृश्य हरिदास तुरणकर यांना दिसले. वाघाला पाहून घाबरून जात ते झाडावर चढून गावातील लोकांना त्यांनी मोबाईलद्वारे ही माहिती कळविली. गावातील 20 ते 25 लोक पट्टेदार वाघाला बघण्यासाठी शिवाराकडे आले.
Tiger footprints
यावेळी उपसरपंच प्रफुल आसूटकर उपसरपंच शैलेश असुटकर हे दोघेही खाली जमिनीवर वाघाचे ठसे दिल्याने त्याचे फोटो काढत असताना झुडपातून वाघ बाहेर आला. व डरकाळी फोडून प्रफुल आसूटकर आणि शैलेश आसुटकर यांच्यावर झेप घेतल्याने दोघेही खाली बाजुला पडले व जोरात धावत जाऊन जवळच असलेल्या नदीच्या पाण्यात उडी घेतली. त्यानंतर नदीत पोहून दुसऱ्या बाजूच्या थडीतून बाहेर निघाले.
Tadoba tigers
समयसूचकता दाखवत नदीत उडी घेतल्याने त्यांचा जीव थोडक्यात वाचला असेच म्हणावे लागेल. मात्र उपसरपंच प्रफुल आसूटकर यांच्यावर वाघाने झेप घेतल्यामुळे खाली पडल्याने त्यांच्या हाताला जबर दुखापत झाली आहे. जवळच नदी असल्याने दोघांचा जीव वाचला असून जीवितहानी टळली आणि वाघ दिसल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Tiger safari
वनविभागानी याकडे लक्ष देऊन त्वरित वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. हा वाघ बामरडा गावाच्या दिशेने गेला असून या परिसरामध्ये सुद्धा भीतीचे वातावरण तयार झाले आहे.