News34 chandrapur
चंद्रपूर : जिल्ह्यातील भद्रावती येथील २० हजार कोटींच्या कोळसा आधारित गॅसिफिकेशन प्रकल्पाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत दाओस येथे सुरू होत असलेल्या 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या व्यासपीठावर मंगळवार, १७ जानेवारी रोजी सामंजस्य करार झाला.
या प्रकल्पामुळे परिसरातील १५००० तर राजुरी स्टील मध्ये १००० युवकांना रोजगार मिळणार आहे. हा प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला गती देणारा ठरणार आहे. खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी त्यांच्या पाठपुराव्याला प्रतिसाद दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे.
Employment
महत्वाची बाब म्हणजे तत्कालीन मुख्यामंत्री मा. सा. कन्नमवार यांनी १९६२ मध्ये आयुध निर्माणी प्रकल्प भद्रावती येथे आणला होता. त्यानंतर आता हा सर्वांत मोठा प्रकल्प खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिंभाताई धानोरकर यांचे पाठपुराव्याने या भागात निर्माण होणार आहे.
Mla pratibha dhanorkar
चंद्रपूर जिल्ह्यात मागील १५ ते २० वर्षात एकही मोठा उद्योग आलेला नाही. मात्र, आता भद्रावती येथे कोळसा उद्योगावर आधारित हायड्रोजन, मिथेनॉल, अमोनिया तयार करण्याचा २० हजार कोटींचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाची घोषणा केली होती. आता या प्रकल्पाचा सामंजस्य करार स्वित्झर्लंड येथील दाओस येथे मंगळवारपासून सुरू होणाऱ्या 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम' च्या व्यासपीठावर झाला. World Economic Forum
सोबतच कोळशापासून युरिया तयार करणाऱ्या न्यू एरा या कंपनीचे प्रमुख बाळासाहेब दराडे हे देखील तेथे गेले आहेत. 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम' च्या व्यासपीठावर होणाऱ्या या सामंजस्य कराराच्या माध्यमातून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाचे प्रवेशद्वार खुले होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांचेकडे पाठपुरावा चालवीत केंद्रीय मंत्री नारायण राणे, पियुष गोयल व राज्यातील उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे कडे सातत्याने पत्राचार व बैठकी घेऊन प्रयत्न केले. याआधी खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्ह्यात टेक्सटाईल पार्क उभारण्याची मागणी लोकसभेत देखील केली होती. यावर उत्तर देत वस्त्र राज्य मंत्री भारत सरकार यांनी २७ एप्रिल २०२२ ला पत्र क्र. १३ / १ / २०२०, २७ एप्रिल २०२२ अन्वये राज्यांकडून प्राथमिक प्रस्ताव मागविल्याचे कळविले होते. जिल्ह्यात उद्योग यावेत म्हणून शरदचंद्र पवार यांचे सोबत उद्योजकांशी संवाद हा कार्यक्रम देखील खासदार बाळू धानोरकर यांनी चंद्रपूर येथील एन. डी. हॉटेल येथे आयोजित केला होता.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील युवकांना रोजगारांची नवी दारे खुली होणार असल्याने समाधानी असल्याचे मत खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केले.