News34 chandrapur
चंद्रपूर - जिल्ह्यातील बल्लारशा विसापूर मार्गावर असलेल्या मातोश्री वृध्दाश्रमच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्य आयोजित सोहळ्यात वृद्धाश्रमाला कठीण काळात सतत सहकार्य करणाऱ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उदघाटक म्हणून उपस्थिती राहणार आहे. old age home
प्रजासत्ताकदिनी (26 जानेवारी) भारतीय समाज सेवा संस्था द्वारा संचालित मातोश्री वृद्धाश्रमाला पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणून हे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती वृद्धाश्रमच्या संचालिका माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी पत्रपरिषदेत दिली.
यावेळी अजय जयस्वाल, वसंतराव थुटे,प्रकाश कोठारी,डॉ रजनी हजारे,बलराम डोडानी आदींची उपस्थिती होती.
Matoshree silver jubilee
भाजप-शिवसेना युतीच्या काळात वर्ष 1996 मध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर मातोश्री वृद्धाश्रमाची स्थापना करण्यात आली होती. संस्था चालविण्यासाठी आम्ही ज्यावेळी अडचणीत आले असता तो जुना किस्सा शोभाताई फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितला.
निराधार वृद्धांना आधार देण्यासाठी हे वृद्धाश्रम सुरू करण्यात आले होते, त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष संचेती होते, सरकारतर्फे अनुदान मिळाले मात्र युती सरकार गेल्यावर कांग्रेसचे सरकार आले आणि 3 वर्षांनी वृद्धाश्रमाचे अनुदान कायमचे बंद करण्यात आले.
त्यावेळी सदर वृद्धाश्रम बंद करावा असा विचार आम्ही केला होता, मात्र त्यावेळी संस्थेत असणारे वृद्ध चिंतेत पडले आता आमचं काय होणार, अशी खदखद त्यांच्या मनात उदभवली, लेकरांनी हाकलून दिले आता जायचं कुठं? असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला, वृद्धांच्या मनात असलेली खदखद लक्षात घेत आम्ही दान दात्याना मदत करण्याचे आवाहन केले आणि सतत वर्ष 2000 पासून आजपर्यंत वृद्धाश्रमाला सढळ हाताने मदत मिळत आहे.
महाविकास आघाडी सरकार मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आम्ही अनुदान पूर्वरत सुरू करण्याची विनंती केली होती, त्यांनी वसतिगृह चा दर्जा देत संस्थेला अनुदान सुरू केले.
अजित पवार यांच्यामुळे 22 वर्षानंतर आमच्या वृद्धाश्रमाला अनुदान सुरू झाले.
मातोश्री वृद्धाश्रमात 100 वृद्ध राहण्याची या व्यवस्था करता आली आहे. येथील वृद्ध उद्योगी असून यामुळे त्यांच्या आयुष्यातील रिकमेपण दूर झाले, अशी माहिती त्यांनी दिली
कोरोना काळात वृध्दाश्रमात असलेल्याच्या नातेवाईकांना दूर ठेवून त्यांना भेटण्यासही मनाई करण्यात आल्याने या ठिकाणी कुठल्याही वृद्धाला कोरोना झाला नाही अशी सुखद वार्ता फडणवीस यांनी दिली.
वृद्धाश्रम जंगल परिसरात असल्याने हिस्त्रप्राण्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून या परिसराला मोठे वॉल कंपाउंड (संरक्षण भिंत) व्हावे अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी वृद्धाश्रमाला सतत सहकार्य करणाऱ्यांचा विशेष सत्कार करणार येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी राज्याचे वन, मत्स्य व्यवसाय,सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर,माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार, आमदार कीर्ती कुमार भांगडीया , आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुभाष धोटे,माजी खासदार नरेश पुगलीया यांची उपस्थिती राहणार आहे.
