News34 chandrapur
वरोरा/चंद्रपूर - राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय, महाराष्ट्र विधानसभेचे माजी उपाध्यक्ष, राष्ट्रवादी कांग्रेसचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर टेम्भूर्डे यांचं 22 जानेवारीला सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. Ncp leader
वरोरा तालुक्यात राष्ट्रवादी कांग्रेसला मजबूत करणारे टेम्भूर्डे यांच्या अचानक जाण्याने पक्षाला मोठा हादरा बसला आहे.
नुकतेच त्यांनी लोकसभा 2024 निवडणुकीत कांग्रेसकडून विद्यमान खासदार बाळू धानोरकर यांना पुन्हा संधी न देण्याचं विधान केल्याने राजकारणात खळबळ उडाली होती.
त्यांच्या निधनाने विविध पक्षाच्या नेत्यांनी दुःख व्यक्त केले आहे.
