News34 chandrapur
चंद्रपूर - मागील काही दिवसांपासून चंद्रपूर शहरात एक इसम स्वतःला मूक-बधिर असल्याचे भासवीत सकाळच्या सुमारास घरी प्रवेश करीत मौल्यवान वस्तूंची चोरी करीत आहे. Chandrapur crime
ज्यावेळी नागरिक सकाळी फिरायला जातात त्यावेळी हा इसम कपाळाला टीका लावत, मूक-बधिर असल्याचे भासवीत देणगी मागतो.
मात्र नागरिक घरी नसल्याची संधी साधत हा इसम घरातील रोख रक्कम, लॅपटॉप व मोबाईल फोनची चोरी करतो.
त्याला कुणी हटकले तर तो स्वतःला मूक-बधिर असल्याचे भासवित आपली सुटका करीत पळ काढतो, असे प्रकार तो गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर शहरात करीत आहे. Chandrapur police
या इसमाने बंगाली कॅम्प, इंदिरानगर परिसरात असे प्रकार केले असून त्याच्यावर रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
असाच एक सीसीटीव्ही व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला असून त्यामध्ये तो घरी प्रवेश करीत लॅपटॉप नेताना दिसत आहे. Cctv video
रामनगर पोलिसांनी चंद्रपुरातील जनतेला आवाहन केले की सदर व्यक्ती आपल्या घरी आला किंवा कुणाला दिसल्यास तात्काळ त्याला पकडत रामनगर पोलिसांच्या स्वाधीन करावे किंवा रामनगर पोलिसांच्या 9850829266, हर्षल एकरे - 7798386838, लालू यादव - 9552800532, पोलीस स्टेशन रामनगर - 07172-253200 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे यांनी केले आहे.
