News34 chandrapur
चंद्रपूर - गोंडवाना विद्यापीठातील सिनेट सदस्यांनी विद्यापीठाच्या सभागृहाला डीडोळकर यांचं नाव देण्याचा ठराव घेण्यात आला होता.
सदर बाब समजताच गडचिरोली जिल्ह्यातील वसंतराव कुलसंगे यांनी डीडोळकर यांच्या नावाला विरोध करीत आमरण उपोषण सुरू केले.
त्यानंतर सिनेट सदस्य निलेश बेलखेडे यांनी सिनेट सदस्यांच्या सभेत डीडोळकर यांच्या नावाला कडाडून विरोध करीत गोंडवाना विद्यापीठ सभागृह व परिसराला क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांचं नाव देण्याची मागणी केली होती.  Gondwana university
त्यानंतर कुलसंगे यांच्या आमरण उपोषणाला यश मिळत तो प्रस्ताव रद्द करण्यात आला.
मात्र माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार व खासदार बाळू धानोरकर यांच्या इशाऱ्याने गोंडवाना विद्यापीठातील कुलगुरू नरमले अशी प्रेसनोट काढत जनता कशी मूर्ख आहे याचं उदाहरण पुढे केले. Vijay vadettiwar
चंद्रपूर जिल्ह्यातील कांग्रेस ही गटबाजीने उफाळून वाहत आहे, कधी समोरासमोर एकमेकांना विरोध करीत कांग्रेसचे नेते पक्ष बुडविण्याचे काम करीत आहे.
जनतेच्या संवेदनशील विषयांवर मात्र हे गप्प राहतील मात्र कामाचं श्रेय घेण्यात यांचा क्रमांक पहिला असतो.
चंद्रपूर जिल्हा अनेक समस्यांनी वेढला आहे, त्याकडे या जनप्रतिनिधी यांचं तिळमात्र लक्ष नाही, नुकतेच घुग्गुस येथील शिक्षक विवेक बोढे यांनी आपल्या जागी बनावट शिक्षक नेमला ते प्रकरण अजूनही ताजे आहे, कांग्रेसचे राजू रेड्डी यांनी प्रकरण उचलून ठेवले असले तर त्यांना वरिष्ठ कांग्रेस नेत्यांनी एकाकी पाडल्याचं चित्र दिसत आहे.
विशेष म्हणजे भाजपच्या राज्य पदाधिकारी शिक्षकांबद्दल महाविकास आघाडी पण फुसका बार ठरला आहे.
खासदार काय म्हणतात...
खासदारांच्या दणक्याने कुलगुरु नरमले
विद्यापीठाच्या सभागृहाला डिडोळकरांचे नाव देण्याच्या ठरावाला स्थगिती
चंद्रपूर - गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांत आदिवासी समाजातील अनेक थोर पुरुषांचे योगदान आहे. परंतु भाजप गोंडवाना विद्यापीठाची गुणवत्ता न वाढविता  संघ पुरस्कृत व्यक्तींची नावे देऊन आदिवासी समाजातील महात्म्यांचा अवमान करीत आहे, असा आरोप खासदार बाळू धानोरकर यांनी केला होता. गोंडवाना विद्यापीठाला वीर बिरसा मुंडा यांचे नाव न दिल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. खासदार धानोरकर यांच्या आंदोलनाच्या धस्क्याने गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु नरमले. विद्यापीठाच्या सभागृहाला डिडोळकरांचे नाव देण्याच्या ठरावाला त्यांनी स्थगिती दिली आहे.  Congress mp balu dhanorkar
गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहाला नागपूर विद्यापीठाचे पूर्व व्यवस्थापन परिषद सदस्य स्व. दत्ता डिडोळकर यांचे नाव देण्याचा ठराव घेण्यात आला. या ठरावाचे तीव्र पडसाद उमटले होते. आदिवासी समाजाच्या संघटनांनी विरोध केला. काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली होती.  गोंडवानाच्या नवनिर्मित सभागृहाला थोर स्वातंत्र्यसेनानी शहीद बिरसा मुंडा यांचे नाव आणि विद्यापीठ परिसरात शहीद क्रांतीसूर्य बाबूराव शेडमाके यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली होती. आदिवासी बहुल जिल्ह्यातील गोंडवाना विद्यापीठाला आदिवासी समाजातील व्यक्तींचे नाव देण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे ही लाजीरवाणी बाब असल्याचेही त्यांनी म्हटले होते. आदिवासी नेते आणि स्वातंत्र्यसेनानी बिरसामुंडा यांनी ब्रिटिशांविरुद्ध तीव्र लढा दिला. ते एकमेव आदिवासी प्रमुख आहेत. ज्यांचे चित्र संसद भवनात लागले आहे. वयाच्या २४ व्या वर्षी हौतात्म्य पत्करलेल्या वीर बिरसा मुंडा यांचे नाव गोंडवाना विद्यापीठाचे सभागृहाला द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन करू, असे धानोरकर म्हणाले.  स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अमर शहीद क्रांतीसुर्य बाबुराव शेडमाके यांचे बलिदान विसरता येणार नाही.त्यामुळे या महापुरुषांची नव्या पिढाली माहिती असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात या हुतात्म्यांचे मोठे  स्मारक नाही.  विद्यापीठ परिसरात त्यांचा पुर्णाकृती पुतळा उभारल्यास नवीन पिढीला त्यांच्या बलिदानाचे स्मरण राहणार आहे. मागणी तत्काळ पूर्ण करावी अन्यथा आंदोलन करु असा इशारा खासदार धानोरकर यांनी दिला. खासदार बाळू धानोरकर यांच्या आंदोलनाच्या धस्क्याने गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॅा. प्रशांत बोकारे नरमले. विद्यापीठाच्या सभागृहाला डि़डोळकरांचे नाव देण्याच्या ठरावाला त्यांनी स्थगिती दिली आहे.
माजी पालकमंत्री वडेट्टीवार यांचं काय म्हणणं आहे...
गोंडवाना विद्यापीठ सभागृहाच्या "डीडोळकर' नामकरणाला स्थगिती
माजी मंत्री वडेट्टीवारांच्या पत्राची गंभीर दखल 
गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहाला स्व.दत्ता डिडोळकर नाव देउन आदिवासी समाजातील थोर हुतात्मे तथा आदिवासी समाजाच्या भावना दुखावणारा ठराव सिनेट मंडळाच्या वतीने 17 जानेवारी 2023 रोजी  पारित केला. जिल्ह्यातील आदिवासी समाजातील थोर हुतात्मे यांच्या नावांना बगल देऊन आदिवासी संस्कृती जतन करणे ऐवजी ती नामशेष करण्याचा जे षडयंत्र सिनेट मंडळाने रचले या विरोधात चंद्रपूर जिल्ह्यात सर्वप्रथम पेटून उठत राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, तथा आ. विजय वडेट्टीवार यांनी थेट गोंडवाना कुलगुरू यांना लेखी पत्रातून सज्जड इशारा देत स्व.दत्ता डिडोळकर यांच्या नावाला विरोध दर्शविला. यामुळे माजी मंत्री वडेट्टीवार यांच्या पत्राची गंभीर दखल घेत गोंडवाना कुलगुरू यांनी अखेर  विद्यापीठाच्या सभागृहाला स्व.डिडोळकर यांचे नाव देण्याच्या ठरावाला स्थगिती दिली असून माजी मंत्री वडेट्टीवार यांच्या दणक्याने आदिवासी समाजाला व संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याला न्याय मिळाल्याचे बोलले जात आहे.
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या मातीशी तीळमात्र ही संबंध नसलेल्या स्वर्गीय दत्ता डीडोळकर यांचे नाव गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहाला देण्याचा ठराव विद्यापीठाच्या सिनेट मंडळाने पारित करताच गडचिरोली जिल्ह्यातील संघटनांनी विरोध करण्यास सुरुवात केली. यातच राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, आ. विजय वडेट्टीवार यांची जन्मभूमी जरी चंद्रपूर जिल्ह्यातली असली तरी मात्र त्यांची कर्मभूमी ही गडचिरोली आहे. मंत्री असो वा आमदार चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील अनेक प्रश्नांना घेऊन आजवर आ.वडेट्टीवारांनी आंदोलने करून तसेच विधानसभेत मांडून यशस्वीरित्या न्याय मिळवून दिला. दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी चा गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट मंडळाचा ठराव हा जिल्ह्याच्या आदिवासी संस्कृतीला नामशेष करण्याचे षडयंत्र असून आदिवासी समाजातील स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांशी आपल्या प्राणाची बाजी लावून लढणारे लढवय्ये योद्धा तथा थोर हुतात्मे क्रांतिवीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके व शहीद बिरसा मुंडा यांच्या नावाला बगल देणे म्हणजेच आदिवासी समाजातील थोर हुतात्म्यांचा हा अवमान असून पारित करण्यात आलेला ठराव हा आदिवासी संस्कृतीला जतन करण्याऐवजी नामशेष करणारा आहे. तसेच सदर ठराव अन्यायकारक असल्याचे कारणावरून माजी मंत्री, आ. विजय वडेट्टीवार  यांनी पारित करण्यात आलेला ठरावाला चंद्रपूर जिल्ह्यातून सर्वप्रथम कडाडून विरोध करत गोंडवाना कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांना लेखी पत्र देऊन तीव्र आंदोलनाचा सज्जड इशारा दिला. सदर पत्राची गंभीर दखल घेत अखेर गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहाच्या स्व.डीडोळकरांच्या नामकरण ठरावाला स्थगिती देण्यात आली असून माजी मंत्री, आ. वडेट्टीवार यांनी घेतलेली कणखर भूमिका याचे सर्व स्तरावरून स्वागत होत असून आदिवासी समाजातील बांधवांकडून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याला न्याय मिळवून दिल्याचे बोलले जात आहे.
