News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मूल - भारत जोडो यात्रेचे शिल्पकार खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे समापन महात्मा गांधीजी पुण्यतिथी दिना निमित्त गांधीजींच्या प्रतिमेला अभिवादन करुन होत असून सकाळी १०.०० वाजता श्रीनगर येथे राहुलजी गांधी यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन यात्रेचा समारोप करण्यात आला. Bharat jodo
याच दिनाचे औचित्य साधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मलिकार्जुन खर्गे यांच्या आदेशावरून तसेच प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशावरून संपूर्ण राज्यात काँग्रेस तर्फे सकाळी १०.०० वा ध्वजारोहण करावे असे आदेश असल्याने मुल तालुका काँग्रेस कमिटी तर्फे दीनांक ३०/०१/२०२३ ला सकाळी १०.०० वा. काँग्रेस कमिटी कार्यालयात काँग्रेस भवन मुल येथे काँग्रेस नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प. अध्यक्ष संतोष सिंह रावत यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
तसेच महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच हात से हात जोडो अभियान राबविण्याचा संकल्प करण्यात आला. याप्रसंगी तालुका काँग्रेस अध्यक्ष गुरु गुरनुले, माजी तालुका अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती घनश्याम येनुरकर, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक राजेंद्र कन्नमवार, ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते बंडूभाऊ गुरनुले, ओबीसी सेलचे राज्य सरचिटणीस गुरुदास चौधरी, युवक काँग्रेस अध्यक्ष पवन नीलमवार, सामाजिक कार्यकर्ते राजू पाटील मारकवार, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष तथा माजी संचालक किशोर घडसे, माजी जी.प.सदस्य, मंगला आत्राम, माजी नगर सेवक लिनाताई फुलझेले, विनोद कामडे, सुरेश फुलझेले, गंगाधर घुगरे, मनोज, यांचेसह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

