News34 chandrapur
चंद्रपूर - आज नागपूर शिक्षक मतदार संघाचे मतदान पार पडले असून जिंकणार कोण हे मतमोजणीच्या दिवशी कळेलचं.
मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजप समोर महाविकास आघाडी समर्थीत सुधाकर अडबाले, शिक्षक भारती चे राजेंद्र झाडे व आप चे देवेंद्र वानखेडे यांनी आव्हान उभे केले आहे. Nagpur Teachers Constituency
यंदाची निवडणूक ही शिक्षकांच्या जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावर लढल्या गेली आहे, विद्यमान आमदार नागो गाणार हे 2 वेळ नागपूर शिक्षक मतदार संघाचे आमदार होते मात्र जुन्या पेन्शनसाठी त्यांनी कधी कठोर भूमिका घेतली नाही. Election 2023
वर्ष 2017 ला पार पडलेल्या निवडणुकीत शिक्षक भारती चा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता, यंदा या निवडणुकीचा निकाल आश्चर्यकारक असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाविकास आघाडी समर्थीत उमेदवार हे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे आहे, मागील 5 वर्षांपासून त्यांनी विदर्भात शिक्षक सहकारी बँकेचे जाळे तयार केले आहे.
दर महिन्याला ते विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात जात, शिक्षकांच्या समस्या काय? त्या समस्यांना शासन दरबारी पोहचविण्याचे काम ते करीत होते.
सुधाकर अडबाले हे चंद्रपूरचे असल्याने नागपुरातील शिक्षकांना चंद्रपूरचा उमेदवार नको अशी खदखद नेहमीच मतदारांनी व्यक्त केली आहे.
शिक्षक भारती चे राजेंद्र झाडे यांनी सुद्धा यंदा विधानपरिषदेत प्रवेश घेण्यासाठी कंबर कसली आहे.
त्यासोबत आप चे देवेंद्र वानखेडे यांनी सुद्धा या निवडणुकीत आव्हान निर्माण केले आहे.
अनेकांनी ही लढत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी होणार म्हटले मात्र या लढतीत शिक्षक भारती व आप ने तगडे आव्हान निर्माण केले आहे.
