News34 chandrapur
चंद्रपूर/गोंडपीपरी - शेतातील पीक संरक्षणासाठी तरुण शेतकऱ्याने शेताभोवती लाकडी कुंपण केले होते. कुंपण काडीत असताना पाय घसरल्याने तरुण शेतकऱ्यांच्या मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गोंडपिपरी तालुक्यातील चेकपिपरी येथे आज 22 जानेवारीला घडली. सोमनाथ शुकनाथ ईस्टाम असे नाव आहे.या घटनेमुळे तालुक्यात शोककळा पसरली आहे.
गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या चेकपिपरी येथील तरुण शेतकरी सोमनाथ शुकनाथ ईस्टाम यांच्या शेतात तुळीचे पीक घेतले होते. तुर पिकाची कापणी झाली. आज तुरीची मळई करावयाची होती. Farmer die
त्यासाठी कुंपण काढत असताना पाय घसरला. कुंपणासहित शेतकरी शेतात असलेल्या विहिरीत पडला.यात शेतकऱ्याच्या दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली.घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.घटनेची माहिती गोंडपिपरी पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार जीवन राजगुरू, मोगरे यांनी घटनास्थळ गाठून मोक्का पंचनामा केला.मृतक शेतकऱ्याचा मृतदेह विहिरीबाहेर काढन्यात आले. पुढील तपास गोंडपीपरी पोलीस करीत आहेत. मृतक सोमनाथ हा अल्पभूदारक शेतकरी होता. त्याच्या पश्चात पत्नी व तीन मुली आहेत. घरची परिस्थिती हलाकीची आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
