News34 chandrapur
चंद्रपूर - व्यक्ती कोणत्याही पदावर गेला किंवा मोठा झाला तरी त्याच्यात जर उपजत कलागुण असतील तर ते कधी ना कधी बाहेर पडतात. अशा कलागुणांची झलक एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने लोकांनाही बघायला मिळते.
असाच एक प्रसंग भद्रावती-वरोरा मतदारसंघात बघायला मिळाला. Mla pratibha dhanorkar
या मतदारसंघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी गुरुदेव सेवा मंडळाच्या भजन कार्यक्रमात सहभागी होऊन चक्क भजन गायले. त्या भजनाचे बोल होते, "असा कसा देवाचा देव ठकडा ग बाई ठकडा ग".
Gurudev seva mandal
भद्रावती तालुक्यातील पावना रै येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथीनिमित्त भव्य खंजरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपस्थित नागरिकांनी आमदार धानोकर यांना भजन मंडळ सहभागी होण्याचा आग्रह धरत भजन गाण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा त्यांनी सुरेल आवाजात भजन गायीले.
