News34 chandrapur गुरू गुरनुले
मुल - वनविभाग चंद्रपूर अंतर्गत चीचपल्ली परिक्षेत्रातील नियत क्षेत्र चीचाला येथील कक्ष क्रमांक ७४९ बिटात दिनांक ६/१०/२०२२ रोजी मौजा ताडाळा या गावचा गुराखी श्री. रामदास मंगरू गोहणे नेहमीप्रमाणे गावातील गुऱ्हे चारण्यासाठी नेले असता झुडुपात दबा धरून असलेल्या वाघाने गुऱ्हाक्यावर अचानक हल्ला करुन गंभीर जखमी केले होते.
Tiger attack in chandrapur याबाबतची माहिती वनविभागाला कळताच वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे यांचे नेतृत्वात कार्यरत असलेल्या वन कर्मचारी यांनी तात्काळ धाव घेऊन गंभीर जखमी गुराखी याला उपचारार्थ शासकीय रुग्णालयात भरती केले. तसेच वरिष्ठ वनाधिकारी यांचे मार्गदर्शाखाली मदतीची कारवाही पूर्ण करुन वन्यप्राण्यांच्या हल्यात जखमी झालेल्या जखमीला आर्थिक मदत देण्याचा शासन निर्णयानुसार पाठविलेला प्रस्ताव मंजूर करुन दिनांक २० जानेवारी २०२३ रोजी जखमीला मदत देण्याचे ठरल्यानुसार ताडाळा येथील ग्राम पंचायतीचे सरपंच श्री राहुल मुरकुटे यांचे उपस्थितीत व त्यांचे हस्ते १ लाख २५ हजार रुपयाचा आर्थिक मदतीचा चेक वाघाच्या हल्यात जखमी असलेल्या रामदास मगरु गोहने यांचे कुटुंबीयांना देण्यात आले. याप्रसंगी चीचपल्ली वन परिक्षेत्रातील क्षेत्र वनरक्षक श्री एस डी. मरस्कोल्हें ,रवी जराते, संदीप सोयाम यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.