News34 chandrapur
चंद्रपूर : मकर संक्रांतीनिमित्त महिला एकमेकींना घरी बोलावून हळदी-कुंक कार्यक्रम घेतात. आता सामूहिक हळदीकुंकू कार्यक्रम घेण्याकडेसुद्धा महिलांचा कल वाढला आहे. परंतु, हळदी-कुंकूच्या कार्यक्रमांत केवळ सौभाग्यवती समजल्या जाणाऱ्या महिलांना सामावून घेतल जाते.
त्यामुळे कळत-नकळत इतर महिला कार्यक्रमापासून वंचित राहतात. समाजातील कोणत्याही महिला अशा उत्सवापासून वंचित राहू नये, या हेतूने नानाजी नगर महिला मंडळ व जनविकास सेना महिला आघाडीतर्फे नागपूर रोडवरील सार्वजनिक दत्त मंदिर समोर 'मानाचे हळदी-कुंकू' या अभिनव उपक्रमाचे आयोजन करून चुकीच्या चालीरीतींना फाटा देण्यात देण्यात आला. यात वडगाव प्रभागातील 700 च्या वर महिला सहभागी झाल्या होत्या.
Haladi kunku
हळदीकुंकू कार्यक्रमाप्रसंगी सावित्रीमाई फुले यांचा इतिहास महिलांना कळावा या दृष्टीने त्यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. यावेळी सावित्रीमाई फुलेंचा जन्म कधी झाला, त्यांच्या आई वडिलांचे नाव काय, यांचे जन्मस्थळ, त्यांचा विवाह कोणत्या वर्षी झाला, त्यांनी महिलांसाठी पहिली शाळा केव्हा व कुठे सुरू केली त्यांचा मृत्यू कशामुळे झाले असे विविध प्रश्न यावेळी महिलांना विचारण्यात आले. विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
Savitribai phule
या कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता संगीता पाहुणे,
अल्का लांडे, मनीषा बोबडे,मनीषा गावंडे, शुंभागी गावंडे, प्रतीक्षा येरगुडे,, वैशाली हिवरकर,माधुरी शास्त्रकार,संगीता वानखेड़े ,अश्विनी तुम्मुलवार,
सपना राणा, रूची चव्हाण,मंजूषा येरगुडे यांनी अथक प्रयत्न केले.तसेच नंदकिशोर पाहुणे,दिलिप मेहता, प्रकाश घुमे व अक्षय येरगुडे यांनी विशेष सहकार्य केले.
पप्पू देशमुख यांचा सपत्नीक सत्कार
वडगाव प्रभागाचे माजी नगरसेवक व जन विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या संकल्पनेतून नानाजी नगर महिला मंडळ व जनविकास सेना महिला आघाडीच्या सदस्यांनी "सर्वांसाठी मानाचे हळदी- कुंकू" या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. शहरातील सुप्रसिद्ध दत्त मंदिर परिसरांचा चाळीस वर्षानंतर कायापालट करण्यामध्ये देशमुख यांचे मोठे योगदान आहे.त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने नानाजी नगर महिला मंडळातर्फे पप्पु देशमुख व त्याची पत्नी रमा यांचा सत्कार करण्यात आला.
