News34 chandrapur
चंद्रपूर - 11 जानेवारी ला सकाळी 10 वाजता चंद्रपुरातील महाकाली मंदिरात 3 दहशतवाद्यांनी अचानक प्रवेश घेत दर्शनासाठी आलेल्या भाविकांना शस्त्राचा धाक दाखवीत ओलीस ठेवले. Mock drill
याबाबत पोलीस कंट्रोल रूम मध्ये फोन खनानतो, पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख पोलिसांचा ताफा घेऊन महाकाली मंदिरात पोहचतात, यावेळी दहशतवाद विरोधी पथक, सी-60 पथक, आरसीसीपी पथक, सुरक्षा शाखा, नक्षल पथक, चंद्रपूर शहर पोलीस पथक सह उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार हे मंदिरात दाखल झाले. Terrorist attack in chandrapur
त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु यांनी कारवाईचे सूत्र हातात घेत भाविकांची सुटका करीत दहशत वाद्यांना ताब्यात घेतात.
सदर प्रकार काय हे मंदिर परिसरातील नागरिकांना कळला नाही, त्यामुळे मंदिर परिसरात नेमकं काय झालं? याबाबत दिवसभर अफवेचा बाजार रंगला होता, महाकाली मंदिरात बॉम्ब असल्याची अफवा दिवसभर शहरात सुरू होती. Bomb in chandrapur
इतकेच नव्हे कारवाईचे व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाले जेणेकरून नागरिक चांगलेच दहशती मध्ये आले होते.
घडलेला सर्व प्रकार चंद्रपूर पोलिसांची रंगीत तालीम होता, चंद्रपुरात दहशतवादी हल्ला झाल्यावर पोलिसांनी काय करायला हवे, याबाबत चंद्रपूर पोलिसांनी प्रात्यक्षिक केले होते. Chandrapur police
प्रात्यक्षिक वेळी सुधाकर आंभोरे, रवींद्र शिंदे, मिलिंद पारडकर, सचिन राखूनडे, अभिमान सरकार अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते.
प्रात्यक्षिक वेळी नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी पोलिसांनी मंदिर परिसरात चौफेर सुरक्षा बंदोबस्त लावला होता.
