News34 chandrapur
चंद्रपूर - तेली युवक मंडळ जिल्हा चंद्रपूर आयोजित भव्य व़धु वर मेळावा २०२३ रोजी सत्कार सोहळ्यात शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी व सिनेट सदस्य निवडून आल्याबद्दल प्रा निलेश र बेलखेडे यांचा समाजभूषण २०२३ पुरस्काराने माजी मंत्री तथा विद्यमान आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, चंद्रपुर विधानसभा आमदार किशोरभाऊ जोरगेवारजी, माजी आमदार भांडेकर जी, तेली युवक मंडळाचे अध्यक्ष खनके सर, तेली समाजाचे जेष्ठ नेते बबनरान फंडजी, धनराज मुंगलेजी, बावणे जी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी संदर यशस्वी कार्यक्रमाबद्दल अभिनंदन व आयोजकांचे आभार मानतांना प्रा निलेश र बेलखेडे यांनी समस्त तेली बांधवाचा ऋणी राहिल व हा सन्मान सदैव समाजकार्यासाठी प्रेरणादायी असून यापुढे हि असचं समाजातील शेवटच्या घटकापर्यंत समाज बांधवांची, युवा विद्यार्थी वर्गाना सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध राहील असे मनोगत व्यक्त केले. यावेळी हजारोच्या वर तेली बांधव-भगिनींची उपस्थिती होती.
