News34 chandrapur
चंद्रपूर - देशाच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त चंद्रपूर येथील वीर शहिद बाबुराव पुलेश्वर शेडमाके शहीद भूमी कारागृह परिसर येथे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
Hansraj ahir ध्वजारोहण प्रसंगी प्रजातंत्र दिनी शुभेच्छा देत असताना संविधानाने दिलेल्या मुलभूत व समानतेचा अधिकार देशाच्या जनतेला मिळालेला हा राष्ट्रीय सणाचा दिवस आहे. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशात लोकशाहीची पुनर्स्थापना झालेला दिवस म्हणजे २६ जानेवारी. देशातील सरकार लोकशाहीवर आधारित यंत्रणा चालते, सरकार चालते याचा सन्मान करताना व संविधानावर विश्वास ठेवतांना लोकशाही प्रधान देशातील सर्व राष्ट्रीय पक्षांनी जिल्हास्तरापर्यंत पक्षांतर्गत लोकशाही जिवंत ठेवल्यास, सन्मान केल्यास देशात जगातील सर्वश्रेष्ठ लोकशाही जी भारतात आहे ती चिरायु होईल. Republic day 2023

याची जाणीव ठेऊन राजकीय नेतृत्वानी पक्षांतर्गत लोकशाहीला महत्व दिले पाहिजे असे विधान प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण प्रसंगी हंसराज अहिर यांनी केले. याप्रसंगी शहिदवीर बाबुराव शेडमाके स्मारक समितीचे अध्यक्ष दयालाल कन्नाके, विलास मसराम, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, धनराज कोवे, माजी नगरसेविका मायाताई उईके, शीतल आत्राम, शीतल कुळमेथे, चंद्रकला सोयाम, विठ्ठलराव कुमरे, अरविंद मडावी, सीमाताई मडावी, वंदनाताई मडावी, शाम गेडाम, प्रीती दडमल, राजू घरोटे, मोहन चौधरी, राजेंद्र खांडेकर, देवानंद वाढई, राजेंद्र तिवारी, आशाताई आबोजवार, बी. बी. सिह, वंदना संतोषवार, पूनम तिवारी, गौतम यादव, संजय खनके, स्वप्नील मुन, मुग्धा खांडेकर, बाळू कोलनकर, विकास खटी, सचिन संदुरकर, बंडू गौरकार, नितीन कारिया, राहुल बोरकर, प्रवीण चुनारकर, राजू बिस्वास यांचेसह अन्य नागरिक, शालेय विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.