News34 chandrapur
कोरपना - अल्ट्राटेक सिमेंट कम्पनी परिसरात नाल्याचे पाणी अडविण्यासाठी लहान तलाव निर्माण करण्यात आला होता मात्र त्या तलावात 3 मुले अंघोळ करण्यासाठी गेले असता ते तलावात बुडाले असल्याची माहिती मिळाली आहे. Breaking news
सदर तिन्ही मुले ही सिमेंट कंपणीमधील अधिकाऱ्यांची मुले असून तिघांचे वय 10 वर्ष असल्याची माहिती मिळाली आहे. News34 breaking
तलाव बाहेर तिघांचे कपडे व चप्पल आढळून आल्याने ही बाब उघडकीस आली. तिन्ही मुले एकाच शाळेत शिकत असल्याचेही माहिती आहे.
सध्या तिघांचा शोध घेण्यासाठी बचाव पथक बोलाविण्यात आले असून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. परिसरात गडद अंधार असल्याने बचाव पथकाला शोधमोहिमेत समस्या निर्माण होत असून आतापर्यंत अल्ट्राटेक प्रशासनाने लाईट ची व्यवस्था केली नाही.