News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर जिल्हा कारागृह येथे बंदीबांधवां करिता गणराज्य दिनी सांकृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, यामध्ये बंदीबांधवा करिता देशभक्तीपर स्वहविहार, नृत्य, गवळण, भजन इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. Chandraput District Jail
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या.श्री.सुमित जोशी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कारागृह अधीक्षक वैभव आगे उपस्थित होते. तर सदर कार्यक्रमास वरीष्ठ तुरुंगाधिकारी रविंद्र जगताप, अतिरिक्त वरीष्ठ तुरुंगाधिकारी नागेश कांबळे, तुरुंगाधिकारी महेशकुमार माळी, तुरुंगाधिकारी विठ्ठल पवार, महिला तुरुंगाधिकारी श्रीमती ज्योती आठवले, गायक कलाकार जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कर्मचारी श्रीमती जुमडे, तुरुंग शिक्षक ललित मुंडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. Republic day 2023
कार्यक्रमाची सुरवातिला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या.श्री.सुमित जोशी यांचे कारागृहाचे वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी कारागृहातील बंदी्जनांनी भजन, गवळण, देशभक्तीपर गीते व नृत्य सादर करुन इतर बंदीजणांचे मनोरंजन केले.तदनंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचारधारेवर आधारित गांधी शांती परिक्षेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या बंद्याना मान्यवरांचे हस्ते गांधीजींची संक्षिप्त आत्मकथा व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तर सदर परीक्षेमध्ये सहभागी ७५ बंद्याना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तदनंतर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित मा. केंद्र शासनाचे आदेशान्वये ७५ टक्के कारावास पुर्ण केलेल्या चंद्रपूर जिल्हा कारागृहातील ०२ शिक्षाधीन बंद्याना गणराज्य दिनी मुक्त करण्यात येत असल्याने सन्मा. मान्यवरांचे हस्ते त्यांना गांधीजींची संक्षिप्त आत्मकथा, पुष्प व प्रमाणपत्र देऊन त्यांचे सुटकेबाबत व उज्वल भविष्ताबाबत शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी न्या.श्री.सुमित जोशी यांनी बंद्याना गणराज्य दिनाचे महत्व, व संविधानामुळे भारतीय नागरिकांना तसेच कारागृहातील बंद्याना प्राप्त झालेले अधीकार तसेच कर्तव्ये याबाबत मार्गदर्शन केले. तर अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन करतांना कारागृहाचे अधीक्षक वैभव आगे यांनी बंदीजनांना बदला न लो बदल के दिखाऒ असे आव्हान करित गणराज्य दिनाचे शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तुरुंग शिक्षक ललित मुंडे यांनी केले. 2 prisoners released
कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी तुरुंगाधिकारी विठ्ठल पवार, कारागृह सुभेदार देवाजी फलके, महेंद्र हिरोळे, हवालदार राजेंद्र देशमुख, प्रकाश नवघरे, कारागृह कर्मचारी रिंकू गौर, श्रीकांत मुंगले , प्रिया नारनवरे, करिश्मा डोकरीमारे इत्यांदी कर्मचारी यांनी विशेश परिश्रम घेतले.