News34 chandrapur
चंद्रपूर/ पतंग उडविण्यासाठी चंद्रपूर शहरात चायनीज नायलॉन मांजा चा मोठ्या प्रमाणात वापर होत असून त्याचे नुकसान मानव व पक्षी जीवांवर होत आहे. Kite festival
पतंग उत्सव दरम्यान शहरातील मार्गावर चालणाऱ्या नागरिकांना चायनीज मांजा मुळे जीवितहानी होण्याची शक्यता होते.
या घटना कश्या टाळता येणार याकडे चंद्रपूर पोलीस अधीक्षकांनी कारवाई सह तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहे. Chinese manja
त्यानुसार चंद्रपूर शहर पोलिसांनी आज 8 चक्री मांजा सह दुचाकी क्रमांक mh34ay3777 एकूण 55 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
चंद्रपूर शहरात मांजा विक्री करणाऱ्या विरोधात अशीच कारवाई सुरू राहणार अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांनी दिली.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक भोंगाडे, पोउपनी लांजेवार, निकोडे सहित पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.