News34 chandrapur
चंद्रपूर - जिल्ह्यात 6 वर्षे दारूबंदी कायम राहिल्यावर वर्ष 2021 ला नव्या सरकारने दारूबंदी उठविली. दारू सुरू झाल्यावर प्रत्येक वार्डात दारूचे दुकान मोठ्या प्रमाणात सुरू होत आहे.
बाबूपेठ येथे दवा आणि दारू आता एकाच ठिकाणी मिळत आहे, विशेष म्हणजे स्थानिक नागरिकांना दारू दुकानं सुरू करण्याबाबत कसलीही विचारणा करण्यात आली नाही.
बाबूपेठ येथे दारू भट्टी, बिअर शॉपी व बार एकाच ठिकाणी सूरु करण्यात आले आहे.
सदर दुकाने सुरू झाल्यापासून स्थानिक महिलांना त्याचा त्रास सुरू झाला असून रस्त्यावर दारुडे लोळत असतात, येणा-जाणाऱ्या महिला व मुलींची त्याठिकाणी छेडखाणी करण्याचे प्रयत्न दारुडे करीत असतात.
बिअर बार ,बिअर शॉपी आणि दारू दुकानाचा स्थलांतरासाठी 23 दिवसापासून उठवणाऱ्या थंडीत महिलांचे उपोषण सुरू आहे. मात्र महिलांच्या या आंदोलना कडे जिल्हा प्रशासनाचे अद्याप लक्ष गेले नाही. या दुकानापासून, मंदिर,बुद्ध विहार, मज्जिद आणि प्रसूती केंद्राच्या अंतर शंभर मीटरच्या आत आहे.
चंद्रपूर - गोंदिया या मार्गासाठी रेल्वे स्थानक देखील याच मार्गांवर आहे. असे असताना या दुकानात परवानगी मिळालीच कशी ? असा प्रश्न महिला उपस्थित करीत आहेत. आंदोलन कर्त्या बाबूपेठ वार्डातील महिला आहेत. दुकानासमोरच त्यांचे आंदोलन सुरू आहे. विद्यार्थिनी, महिला ज्या मार्गाने ये-जा करतात त्याच मार्गावर ही दुकाने आहेत. दुकान परिसरात मद्यापिंची मोठी गर्दी असते.भांडण,शिव्याशाप देण्याचे प्रकार इथ घडत असतात.याचा त्रास महिलांना होतो आहे.