News34 chandrapur
चंद्रपूर - सिंदेवाही येथील शिवनी वनपरिक्षेत्रातील मौजा चारगाव येथील एका 19 वर्षीय युवकाचा वाघाच्या हल्यात मृत्यु झाला.
ही घटना 9 जानेवारीला सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली होती. हल्ला करणारा वाघ नसून ती वाघीण असल्याचे स्पष्ट झाले आहे.त्या वाघिणीला कुकडहेटी येथे जेरबंद करण्यात आले. या वाघिणीला ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला स्थानांतरित करण्यात आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. Transit Treatment Center
ताडोबा बफर झोन मधील शिवनी वनपरिक्षेत्रातील चारगाव येथील श्रीकांत पटवारु श्रीरामे (19) हा दिनांक 6 जानेवारी रोजी आपल्या शेतावर गेला असता तो घरी परत आला नाही, त्याची शोधा शोध घरच्यांनी मित्र मंडळी तसेच नातेवाइकांकडे केली. दरम्यान 8 जानेवारी रोजी याची तक्रार सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे नोंदविन्यात आली. Tadoba Buffer Zone
8 जानेवारी रोजी कुकड़हेट्टीच्या शेतशिवारात एका शेळीला वाघाने ठार मारल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर वनविभागाची टीम घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. ही घटना ताजी असतांनाच दिनांक 9 जानेवारीला सकाळी एका युवकाचा मृतदेह त्याच परिसरात (कुकडहेट्टी गट क्र. ८६४) आढळला.परंतु या घटनेत वनविभागाने कोणत्याही पक्षाच्या समक्ष पंचनामा न करताच युवकाचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविला व चारगाव येथील पटवारु श्रीरामे यांना फोन द्वारे तुमचा मुलगा वाघाच्या हल्यात ठार झाल्याची माहिती दिली. Tiger attack in chandrapur
यानंतर चारगाव व कुकडहेटी येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी (कुकडहेट्टी गट क्र. ८६४) एकच गर्दी केली व शिवनी वनविभागावर रोष व्यक्त केला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.विषयाचे गांभीर्य ओळखून वनविभागाने हल्ला करणाऱ्या वाघाचा शोध घेणे सुरू केले. कुकडहेट्टी येथे वाघिणीला जेरबंद करण्यात आले.
Tadoba tiger
नोकरीसाठी श्रीरामे यांना सादर करावा लागेल प्रस्ताव
संतापलेल्या नागरिकांनी मृतक श्रीकांत श्रीरामेच्या भावाला नोकरी मिळावी अशी मागणी लावून धरली. वाढता तणाव लक्षात घेता उपसंचालक (बफर)ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प यांनी पटवारू श्रीरामे यांना एक पत्र दिले आहे.या पत्रानुसार प्रशांत पटवारू श्रीरामे 12 वी पास झाल्यानंतर त्याला नोकरीसाठी प्रस्ताव सादर करावयाचा आहे. असे असले तरी,खरंच प्रशांतला कायमस्वरूपी नोकरी मिळेल काय. ? यावर आता चर्चा सुरू आहे.
Human Wildlife Conflict
मग त्या लोकांचे काय .?
जिल्ह्यात वन्यप्राणी व मानव संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. ही बाब लक्षात घेता,मृतकाच्या परिवाराला एकूण 20 लाख रु मदत देण्याचा निर्णय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ऑगस्ट 2022 ला लागू केला. परंतु उपसंचलकांनी नोकरीसाठी प्रस्ताव सादर करण्याचा सल्ला श्रीरामे परिवाराला दिल्याने या घटनेपूर्वी वाघाच्या हल्ल्यात मृत पावले त्यांच्या परिवारचे काय .?असा प्रश्न निर्माण झाला आहे.वाघाच्या हल्ल्यात 2021 मध्ये 39 तर 2022 मध्ये 51 लोकांना प्राण गमवावे लागले होते.
लोकांना शांत करण्यासाठी ते पत्र
नागरिक भडकले होते.त्यांना शांत करण्यासाठी पत्र दिले. शासकीय नोकरी मिळणे इतके सोपे नाही. प्रशांत 12 वी पास झाल्यानंतर प्रस्ताव आला तर तो वरीष्ठांकडे पाठवू. शिफारस करू.हे पत्र म्हणजे आमची समयसूचकता आहे. अशी स्पष्टोक्ती उपसंचालक(बफर)कुशाग्र पाठक यांनी दिली.