News34 chandrapur
नागपूर: राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे ऋषभ राऊत, पराग वानखेडे, विनोद हजारे यांच्या नेतृत्वात महाज्योतीच्या कार्यालयासमोर राज्यातील सन २०२२-२३ वर्षातील टॅब वाटप, पोलीस भरती व स्पर्धा पूर्व परीक्षा (JEE/NEET) चे प्रशिक्षण केंद्र संदर्भातील मागण्यांबाबत निदर्शने करण्यात आली.
Mahajyoti
राज्यात होऊ घातलेल्या Police Recruitment व (JEE/NEET)चे स्पर्धा पूर्व परीक्षांचे प्रशिक्षण केंद्र प्रत्येक जिल्ह्यात उभारावे आणि शेतकऱ्यांसाठी शेतात पावसापासून संरक्षणासाठी शेड उभारणीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. सोबतच असे केंद्र उभारण्यासाठी काढण्यात येणाऱ्या निविदा प्रक्रियेत ही केंद्रे ओबीसी, व्हिजेएनटी व एसबीसी प्रवर्गीय निवेदिकांनाच बार्टी व सारथी या संस्थांच्या धर्तीवर देण्यात यावी अशी मागणी केली. कारण राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग शासन निर्णय क्र.बार्टी २०२१ /प्र.क्र.११६/बांधकामे मंत्रालय, मुंबई दिनांक २८ ऑक्टोबर२०२१ च्या शासन निर्णयानुसार , महाज्योतीमध्ये सुद्धा OBC, व्हिजेएनटी व एसबीसी च्या संस्थाना प्रथम प्रधान्य देवून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती करण्यात आली. त्याचप्रमाणे महाज्योतीच्या योजनांचा प्रचार प्रसार व्हावा व गरीबातील गरीब विद्यार्थांना योजनाचा लाभ मिळावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यात समन्वयक नेमून कलापथकाद्वारे ग्रामीण भागात महाज्योतीच्या विविध योजनाचा प्रचार प्रसार करण्याची मागणी सुध्दा करण्यात आली.
यावेळी निवेदनही देण्यात आले. राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे विभोर बेलेकर, दिब्या पटले ,नेहा उमाठे, ख़ुशी दुरुगकर, सोनल शिवणकर, धनश्री जांभूळकर,तनुश्री चव्हाण, शिवानी विश्वकर्मा, पल्लवी केरेकर, रोशन बुरडे, राहुल निमजे, श्रावण बिसेन, पल्लवी पवार, निशिगंध लोणारे, कोमल हांडे, पूजा फुलमते, तनिशा बान्ते, आस्था मून, नेहा उम्रेटे आदींचा समावेश शिष्टमंडळात होता.