News34 chandrapur
चंद्रपूर - नवे जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपुरात आल्याने अनेक अवैध धंदे बंद झाले होते, मात्र आता एक गोलू छुप्या मार्गाने जुगार क्लब चालवीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. Gambling club in chandrapur
चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या मागे असलेल्या जंगलात अनेक दिवसापासून गोलू नामक जुगार बहाद्दरने त्याठिकाणी जुगार क्लब सुरू केले असल्याचे परिसरातील नागरिकांनी बघितले आहे. Chandrapur forest
राजुरा तालुक्यातील जंगलात सुरू असलेल्या जुगार क्लब वर स्थानिक गुन्हे शाखेने धाड मारल्यावर आता जुगार बहाद्दूर चंद्रपूरच्या दिशेने वळले आहे.
या जुगार क्लब मध्ये 52 पत्त्यांचा आस्वाद घेण्यासाठी कागजनगर, राजुरा, गडचांदूर, मूल, वरोरा व वणी तालुक्यातून मोठे खेळाडू येत असल्याची माहिती आहे.
जुगार क्लब च्या संचालक मंडळात गोलू सहित चंद्रपुरातील काही राजकीय व्यक्तींचा सहभाग आहे, अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या ह्या क्लबची माहिती रामनगर पोलिसांना अजूनही मिळाली नाही हे एक आश्चर्यचं म्हणावे लागले. Chandrapur news