News34 chandrapur
चंद्रपूर - शहरातील बाबूपेठ भागात बार, बिअर शॉपी व देशी दारूचे दुकान लोकवस्ती मध्ये सुरू झाल्याने नागरिकांनी मागील 30 दिवसापासून दारू दुकानासमोर आंदोलन सुरू केले आहे.
सदर दारूचे दुकान तात्काळ प्रशासनाने स्थलांतरित करावे अशी मागणी आंदोलनकर्त्या महिलांनी केली आहे. Liquer shop
महिलांच्या मागणीवर उत्पादन शुल्क विभागाने उभी बाटली व आडवी बाटली प्रमाणे निवडणूक घेण्याचे ठरविले आहे.
सदर मतदान प्रक्रियेत बाबूपेठ प्रभागातील 11 हजार महिला सहभाग घेणार असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत माजी नगरसेवक स्नेहल रामटेके व आंदोलनकर्त्या महिलांनी दिली आहे. Protest
एका रात्री सुरू झालेल्या दारू दुकानामुळे परिसरातील महिला व मुलींना दारुड्यांचा नाहक त्रास सुरू झाला आहे, विशेष म्हणजे ज्याठिकाणी दारू दुकाने सुरू झाले आहे तो मार्ग बाबूपेठ प्रभागात जाणारा मुख्य रस्ता आहे.
याकरिता मागील महिन्याभरापासून प्रभागातील महिला ठिय्या आंदोलन करीत आहे.
ज्यादिवशी महिलांनी आंदोलन सुरू झाले त्यादिवसापासून आंदोलनकर्त्या महिलांना दारू दुकानात काम करणारे अश्लील शिवीगाळी करीत आहे. Babupeth liquer shop
सदर दुकाने ही लोक वस्तीत नकोच अशी मागणी महिलांनी प्रशासनाकडे केली आहे, याविरोधात प्रभागातील हजारो महिला भव्य मोर्चा प्रशासनविरोधात काढणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे.
महिलांच्या या आंदोलनाला आमदार किशोर जोरगेवार, माजी आमदार वामनराव चटप, आम आदमी पार्टी, जनविकास सेना, भीम आर्मी व शहरातील सामाजिक संघटनांनी समर्थन दिले असून आयोजित आंदोलनात सुद्धा राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचा सहभाग राहणार आहे.