News34 chandrapur
चंद्रपूर/नागभीड - चंद्रपूर जिल्ह्यात वर्ष 2022 मध्ये मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. Tiger vs leopard
जिल्ह्यातील तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्र अंतर्गत गोविंदपूर क्षेत्रातल्या येणोली बिटात मादा बिबट्याचा मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली होती.
वनरक्षक श्रीरामे हे गस्तीवर असताना सकाळच्या सुमारास अंदाजे 2 वर्षे वयाच्या मादीचा मृतदेह मिळाला.
प्रथमदर्शी अंदाजात बिबट्याचा मृत्यू वाघाच्या झुंजीत झाला अशी माहिती मिळाली.
वनविभागाच्या चमूने घटनास्थळी पोहचत मोक्का पंचनामा केला, यावेळी पशुधन विकास अधिकारी कु. ममता वानखेडे, नागभीड, तथा पशुधन विकास अधिकारी एस.बी.बनाईत तळोधी बा. यांनी शवविच्छेदन केले, यावेळी मृत बिबट चे काही अवयवांचे नमुने गोळा करून ते समोरील तपासणी करण्या करिता पाठवीण्या आली. Tadoba tiger
यावेळी के.आर. धोडने, सहाय्यक वन संरक्षक,वन विभाग ब्रह्मपुरी, एस.बी. हजारे, वनपरिक्षेत्र अधिकारी नागभीड, एक.बी.वाळके क्षेत्र सहाय्यक तळोधी बा. आर.एस. गायकवाड क्षेत्र सहाय्यक गोविंदपुर, विवेक करंबेकर मानद वन्यजीव रक्षक ब्रम्हपुरी, यश कायरकर वन्यजीव प्रेमी व अध्यक्ष स्वाब नेचर केअर संस्था, जिवेश सयाम, प्रशांत सहारे, स्वाब संस्था सदस्य, तळोधी बा, वनपरिक्षेत्रातील संपूर्ण वनरक्षक कर्मचारी उपस्थित होते.
