News34 chandrapur
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही - सिंदेवाही तालुक्यातल्या सरडपार चक येथील एका ईसमाने (विरव्हा नविन) शाळेचा मागे असलेल्या कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवार
मृतक नामे श्रिहरी गोपाळा ढोक वय 52 वर्ष रा. सरडपार चक (विरव्हा नविन ) ता. सिंदेवाही असे असुन मृतक श्रिहरी हा काल दिनांक 2 जानेवारी मंगळवार रात्रौ 1 वाजता कोणाला काहीही न सांगता घराबाहेर गेला होता. तो परत आलाच नाही त्यामुळे रात्रभर त्याचे नातेवाईकांनी त्याचा गावात व आजुबाजुचे परिसरात शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही. आज दिनांक 03 जानेवारी रोजी मंगळवार ला सकाळचा दरम्यान सरडपार चक (विरव्हा नविन) येथिल शाळेच्या मागील माराईचे देवीचे मागे सेवडोर व कडुलिंबाच्या झाडाला दोरीने सहाय्याने गळफास घेवुन मृतक श्रिहरी हा लटकला अवस्थेत दिसला. अशी माहीती मिळताच घटणास्थळी सिंदेवाही पोलीस पोहचले असुन पोलीसांनी सदरचा मर्ग दाखल करून तपासात घेतला आहे.
