News34 chandrapur
चंद्रपूर - नववर्षानंतर चंद्रपुरात धाडसी चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
चंद्रपूर शहरातील भानापेठ वार्डातील सिटी पोस्ट ऑफिस वर राहणारे वैभव बोनगीरवार यांच्या घरी अज्ञातांनी प्रवेश करीत अंदाजे 7 ते 8 लाखांच्या मुद्देमालावर हात साफ केला.
शहराच्या मध्यभागी सकाळी 11 ते 12 वाजे दरम्यान धाडसी चोरी झाल्याने पोलीस प्रशासनात सुद्धा खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार घरातील सदस्य भाजीपाला घेण्यासाठी बाहेर गेले होते, त्यानंतर कुणीतरी अज्ञातांनी घरी प्रवेश करीत, सोने चांदीचे आभूषण सहित तब्बल 7 ते 8 लाखांचा मुद्देमाल लंपास केला. Big robbery in chandrapur
धाडसी चोरी ची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, पोलीस निरीक्षक सुधाकर आंबोरे सहित स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. Chandrapur crime
सध्या शहर पोलिसांनी तपास सुरू करीत अज्ञात चोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. Chandrapur police

