सरकारने खाजगीकरण करू नये अशी प्रमुख मागणी वीज संघटनांनी केली आहे. 3 जानेवारीच्या रात्री 12 वाजेनंतर 72 तासासाठी हे सर्व कर्मचारी संप करणार आहे. यावेळी कर्मचारी कर्तव्यावर हजर राहणार नाही. त्यामुळे संपा दरम्यान विद्युत पुरवठा काही कारणास्तव बंद झाल्यास नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जाण्याची शक्यता असल्याने राज्यातील नागरिक चिंतेत आहे. Adani power
राज्यातील वीज कंपन्यांचे खाजगीकरण केले जाणार आहे. अदानी ग्रुपसोबत करार करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती कामगारांना मिळाल्याने त्यांनी त्यास विरोध सुरू केला आहे. त्यामुळे वेळीच सरकारने निर्णय घेतला नाहीतर वीज कर्मचारी खाजगीकरणाच्या मुद्दावरुन अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. Opposition to privatisation
मंगळवारी मध्यरात्रीपासून ते शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत हा संप असेल. यादरम्यान कर्मचारी कुठलेही काम करणार नाहीत. त्यामुळे आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास त्याचा वीज प्रणालीवर परिणाम होईलच. 72 hours strike तसेच महानिर्मिती कंपनीतील कर्मचारीदेखील संपावर असतील. आज वीजनिर्मिती, पारेषण व वितरण यांचे स्वयंचलीकरण झाले असले तरी कर्मचाऱ्यांची गरज भासतेच. त्यामुळे वीज उत्पादनावरही संपाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. यानंतरही सरकारने योग्य पावले न उचलल्यास १८ जानेवारीपासून बेमुदत संप पुकारला जाईल, असा इशारा कामगार संघटनांनी दिला आहे. Indefinite strike
