News34 chandrapur
चंद्रपूर - गोंडपीपरी नगरपंचायत मधील अपक्ष नगरसेविकेचे पती खेमचंद गरपल्लीवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याने चंद्रपूर पोलिसांनी गरपल्लीवार यांच्यावर 1 वर्षासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
BJP worker deported
BJP worker deported
विशेष म्हणजे खेमचंद गरपल्लीवार यांनी काही महिण्याआधी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला होता. Offensive post
मागील वर्षी अमृता फडणवीस यांनी देहविक्री ला मान्यता मिळावी अशी प्रतिक्रिया दिली होती, त्या प्रतिक्रियेवर गरपल्लीवार यांनी समाजमाध्यमावर फडणवीस यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करीत महिलांना लज्जा वाटेल अशी व समाजात तेढ निर्माण होणार अशी पोस्ट केली. Amruta fadanvis
विशेष म्हणजे खेमचंद गरपल्लीवार यांच्यावर गोंडपीपरी पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहे. ज्यामध्ये विनयभंग, दादागिरी, फसवणूक करीत जमीन बळकविणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे.
गरपल्लीवार यांनी अमृता फडणवीस यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली असता त्यावेळी ते भाजप पक्षात नव्हते, आक्षेपार्ह पोस्ट केल्यावर 2 महिन्यांनी गरपल्लीवार हे भाजप पक्षात गेले.
गरपल्लीवार यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असतांना सुद्धा गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तीला भाजप पक्षात प्रवेश मिळाला होता.
भाजपात आल्यावर त्यांना पोलिसांनी तब्बल 1 वर्षासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार केले असल्याने पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
गोंडपीपरी पोलिसांनी उपविभागीय पोलिस अधिकारी मूल यांच्या मार्गदर्शनाखाली गरपल्लीवार यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 56 (1) (अ) (ब) अंतर्गत हद्दपारीचा प्रस्ताव तयार करीत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला होता.
सुनावणी झाल्यावर गरपल्लीवार यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली.
