News34 chandrapur
चंद्रपूर - राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरितील यशापाठोपाठ नागपुर येथे पार पडलेल्या कामगार राज्य नाट्य स्पर्धेच्या नागपुर विभागीय प्राथमिक फेरीत इरफान मुजावर लिखित बकुळ धवने दिग्दर्शित वृंदावन हे नाटक सांघिक द्वितीय क्रमांकांचे मानकारी ठरत स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाले आहे. State drama competition
वृंदावन सर्वोत्कृष्ट निर्मितीसह 5 पारितोषिकांचे मानकरी ठरले आहे.
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन द्वितीय बकुळ धवने , सर्वोत्कृष्ट नेपथ्य द्वितीय तेजराज चिकटवार - पंकज नवघरे, पुरुष अभिनय प्रथम उत्तेजनार्थ पंकज मलिक आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री द्वितीय बकुळ धवने अशी पारितोषिके पटकवत वृंदावन ने कामगार राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.
