News34 chandrapur
चंद्रपूर - काळ्या सोन्याचं शहर म्हणून चंद्रपूर ची ओळख आहे, मात्र या काळ्या सोन्यासाठी काम करणारे अधिकारी नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहे. Black gold city chandrapur
या मनमानी कारभाराला विरोध हा फक्त मौखिक होतो कारवाई मात्र नाही, चंद्रपूर वेकोली क्षेत्रात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या मुलीचे लग्न आहे, त्यासाठी वेकोलीच्या 7 ते 8 वाहनांचा सर्रासपणे वापर सुरू आहे.
चंद्रपूर वेकोलीच्या महाप्रबंधक कार्यालयात कार्यरत नांदगाव निवासी अधिकाऱ्याच्या मुलीचे लग्न असल्याने त्यांनी वेकोली मधील गाड्यांचा लग्नकार्यासाठी वापर सुरू केला आहे.
यामुळे वेकोली प्रशासनाला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वेकोलमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामासाठी एजन्सीला नेमत भाड्याने गाड्या लावण्यात येतात, मात्र कार्यालयीन वापरासाठी मिळणाऱ्या गाड्या अधिकारी खासगी कामासाठी वापरतात.
लग्न समारंभात त्या अधिकाऱ्याने 7 ते 8 वाहनांना लग्नाचे साहित्य, पाहुण्यांना ने-आण करण्यासाठी वाहनांचा वापर सुरू केला आहे.
वेकोली क्षेत्रात सामान्य नागरिकांना जाण्यास प्रतिबंध आहे, तसा नियम खाणं क्षेत्रात लागूही करण्यात आला आहे.
इतकेच नव्हे तर लग्न समारंभात येणाऱ्या पाहुण्यांची सैर-सपाटा सुद्धा या वाहनाने केल्या जात असल्याची माहिती आहे.
खासगी कामासाठी वाहनांचा वापर ही बाब वेकोली साठी नवी नाही कारण याआधी अनेकदा असे प्रकार घडले आहे, सिएमडी मनोज कुमार यांनी वर्ष 2021 मध्ये असा प्रकार पुन्हा घडला तर कारवाई केल्या जाणार असा मौखिक आदेश दिला होता. Wcl chandrapur
त्यावेळी चंद्रपूर मुख्य महाप्रबंधक यांनी अधिकाऱ्यांना बोलावीत खडेबोल सुनावले होते, पण कारवाई मात्र झाली नसल्याने अधिकाऱ्यांचे मनोबल वाढले आहे.
या सर्व प्रकाराबाबत चंद्रपूर वेकोली क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक संजय वैरागडे यांच्याशी संपर्क साधण्यात आला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

