News34 chandrapur गुरू गुरनुले
मुल - नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्था शाखा मुल तर्फे विधवा महिलांसाठी दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती कविता मोहूरलें यांचे आवारात हळदीकुंकू व वृक्ष वाणाची भेट अशा अभिनव उपक्रमाचे आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन आणि राष्ट्रमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. नागपुर विभाग सचिव कविता मोहुर्ले यांनी प्रास्ताविका मध्ये विधवा महिलांच्या दैनंदिन जीवनाची आपबिती सांगुन विधवा महिलांनी खंबीर राहुन परिवर्तनशील जिवन स्वाभिमानाने आणि आत्मसन्मानाने जगावे असे सांगितले. प्रमुख पाहुणे श्रीमती शालु गुरनुले यांनी कोण काय म्हणेल, याकडे लक्ष न देता जो पर्यंत आयुष आहेत तोपर्यंत स्वतः साठी जगण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले.

तर अध्यक्षीय भाषणात तेजस्विनी नागोसे यांनी सावित्रीबाई फुले यांनी सांगितल्या प्रमाणे कुठल्याही प्रकारचे भेद न ठेवता सर्व महिलांनी एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण व्हावी हा मुळ उद्देश ठेवून अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करुन कुठलाही जातीभेद न करता सर्व धर्मातील विधवा महिलांना अशा कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे असे सांगितले. वैचारिक प्रगल्भता वाढवून परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे हे स्विकारण्याची गरज आहे हे सांगितले. संचालन रत्ना चौधरी यांनी तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मिरा शेंडे यांनी केले. या अभिनव उपक्रमाला श्रीमती मुनगंटीवार, शालु वाणी,शालु गुरनुले,नंदा वाढई, अवझे ताई, माधुरी खोब्रागडे, माधुरी बलगेवार, गुरनुले ताई,निकुरे ताई,पुजा मोहुर्ले, मानमपल्लीवार ताई, डोईजड ताई, रामटेके ताई या महिलांना पुष्परोप आणि ब्लाऊज पिस भेट देण्यात आले. अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा तेजस्विनी नागोसे, नागपूर विभाग अध्यक्षा रत्ना चौधरी, नागपूर विभाग सचिव कविता मोहुर्ले,मुल तालुका अध्यक्षा मिरा शेंडे, मुल तालुका संघटिका जेष्ठ सभासद शशिकला गावतुरे, तालुका संघटिका नंदा शेंडे, माधुरी गुरनुले, सुनिता खोब्रागडे, पुजा मोहुर्ले, नवनियुक्त सभासद स्वाती वाडगुरे उपस्थित होते.