News34 chandrapur
बल्लारपूर - मकरसंक्रांती निमित्त बल्लारपूर शहरातील श्री मंगल कार्यालय येथे महिलांच्या विविध संघटनांनी एकत्र येत हळदी कुंकू व स्नेह मिलनाचा कार्यक्रम 22 जानेवारीला आयोजित केला होता.
आयोजित कार्यक्रमात तहसीलदार स्नेहल रहाटे, डॉ. रजनीताई हजारे, डॉ. अभिलाषा गावतुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात उपस्थित डॉ. गावतुरे यांनी मार्गदर्शनपर भाषणात आपल्या कुटुंबासहित चांगला समाज घडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, माता फातिमा, माता रमाई, इरावती यांचा आदर्श घेत महिलांनी आपले आयुष्य जगायला हवं, मुलगी झाली तर समाज नाराज होतो, परिवारातील सदस्यही नाराज होतात मात्र तसे न करता मुलगी झाली तर गावभर साखर वाटून आनंद साजरा करायला हवा.
यावेळी उपस्थित महिलांना वान म्हनून राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई, माता रमाई, राणी अहिल्याबाई होळकर, मा फातिमा शेख यांची पुस्तके देण्यात आली.
सोबतच विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांचा सत्कार यावेळी करण्यात आला, यामध्ये प्रथम महिला ऑटो चालक सपना पाटील, पक्षीप्रेमी श्रुती लोणारे, ग्रामपंचायत सदस्य गीता वाघाडे, उज्वला चव्हाण, संगीता देठे, सुनीता निवलकर, अरुणा डांगे, संगीता सत्रे, अंजली भोसले, गीता घुडसे, हतीया कुरेशी, बेबी काळे, कल्पना कोळस, गोदा कुलमेथे यांचा सहभाग होता.
कार्यक्रमाची प्रस्तावना उज्वलाताई चव्हाण यांनी केली, तर सुत्रसंचालान शितल हस्ते व उमा भटारकर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुधीर कोरडे, विवेक खुटेमाटे, केशव थिपे, अमोल काकडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

