News34 chandrapur
अहमदनगर/चंद्रपूर - काही दिवसांपूर्वी चंद्रपुरातील महाकाली मंदिरात पोलिसांनी मॉक ड्रिल केलं मात्र पोलिसांची ती रंगीत तालीम वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. Mock drill
कारण मॉक ड्रिल मध्ये बनावट दहशतवाद्यांनी धार्मिक घोषणाबाजी केल्याने समाजात तेढ निर्माण करण्याचा आरोप पोलिसांवर करण्यात आला आहे.
या प्रकारानंतर पोलीस विभागावर माफी मागण्याची वेळ आली, चंद्रपूर नंतर तसाच प्रकार अहमदनगर इथे घडला असल्याची माहिती मिळाली आहे. Religious sloganeering
रविवारी अहमदनगर येथील बस स्थानकावर दहशतवादी घुसल्याचं पोलिसांनी मॉक ड्रिल केले, अचानक पोलिसांचा फौजफाटा बघून नागरिक घाबरले होते, 3 दहशतवादी बसस्थानक परिसरात शिरत संपूर्ण परिसराचा कब्जा केल्याची वार्ता शहरात पसरली.
मॉक ड्रिल च्या वेळी बनावट अतिरेक्यांनी धार्मिक घोषणाबाजी केली आणि पोलिसांचं प्रात्यक्षिक वादात सापडलं.
समाजात तेढ निर्माण करण्याचा आरोप पोलीस विभागावर लावण्यात आला असून याविरोधात सामाजिक संघटनांनी पोलिसांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
