News34 chandrapur
चंद्रपूर/वरोरा - गावात दारू सुरू करण्यासाठी नागरी ग्रामपंचायत मध्ये 29 डिसेंम्बरला ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती मात्र ती सभा फक्त 15 मिनिटात आटोपती करीत दारू दुकानाला नाहरकत प्रमाणपत्र देण्याचा ठराव घेण्यात आला.
Dispute Liqur shop
Dispute Liqur shop
वरोरा तालुक्यातील नागरी गावातील लोकसंख्या 4 हजार 500 आहे, मात्र ग्रामसभेला फक्त आपल्या मर्जीतील 100 जणांना उपस्थित करीत दारू दुकानाला नाहरकत प्रमाणपत्र देण्याचे मंजूर केले.
या ग्रामसभेवर गावातील डॉ. मनोज तेलंग यांनी आक्षेप घेत आवाज उचलत दारू दुकान सुरू होऊ देणार नाही व वादग्रस्त ग्रामसभेची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
याबाबत चौकशी व्हावी याकरिता गावातील महिलांनी पंचायत समिती वरोरा व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर येथे धडक देत 2 जानेवारीला निवेदन दिले.
30 वर्षापूर्वी गावात दारू दुकान होते मात्र महिलांच्या आंदोलनांनंतर ते दुकान बंद करण्यात आले, शासनाच्या नियमानुसार दारू दुकानाला नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी 100 टक्के महिलांची उपस्थिती आवश्यक आहे, विशेष म्हणजे नागरी ग्रामपंचायत मध्ये कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी असताना सुद्धा प्रभारी सचिवामार्फत ग्रामसभा घेण्यात आली.
सदर ग्रामसभा ही पूर्णपणे नियमबाह्य असल्याचा आरोप डॉ. मनोज तेलंग व अमर गोंडाने यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.
नियमानुसार ग्रामसभा घेत त्यामध्ये महिलांची उपस्थिती ही 100 टक्के हवी होती मात्र तसे काही झाले नाही, नागरिकांच्या मनातली कौल काय? 4 हजार नागरिकांच्या भविष्याचा विचार ग्रामसभेत आलेले शेकडो लोक करणार काय? असा मुद्दा यावेळी तेलंग यांनी उपस्थित केला.
आमच्या मागणीला प्रशासनाने न्याय दिला नाही तर 26 जानेवारी पासून आम्ही आंदोलनाची सुरुवात करीत, रस्ता रोको, उपोषण, पदयात्रा, धरणे व मोर्चा काढू असा इशारा मनोज तेलंग यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.