News34 chandrapur
कारणही तसंच होत, सकाळी अचानक शस्त्रधारी पोलीस महाकाली मंदिर परिसरात पोहचले, श्वानपथक, पोलीस कर्मचाऱ्यांचा भला-मोठा ताफा मंदिरात पोहचला. Bomb in chandrapur
हातात शस्त्र घेत पोलीस झाडाझडती घेऊ लागले, मंदिरात बॉम्ब असल्याची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पोहचली, सोबतच मंदिरात 3 नक्षलवाद्याना अटक करण्यात आली.
बॉम्ब डिफ्युज करण्यात आला, पोलीस आरोपींना घेऊन बाहेर आले. Chandrapur police
मात्र त्यांनतर हा सर्व पोलिसांचा सराव (मॉक ड्रिल) होता, सदर बाब नागरिकांना कळल्यावर त्यांनी सुटकेचा निश्वास घेतला.
या सराव कार्यक्रमात ATS, चंद्रपूर पोलीस व C60 व श्वानपथक यांचा संयुक्त सहभाग होता.
दिवसभर महाकाली मंदिरात बॉम्ब भेटला अशी अफवा नागरिकांमध्ये सुरूच होती.
