News34 chandrapur
चंद्रपूर /अमरावती - राज्यात आता आमदारांच्या अपघाताच्या घटनेत वाढ होत आहे, मात्र हा घातपात तर नाही न अशी शक्यता काही आमदारांनी व्यक्त केली आहे. Breaking news
या साखळी मध्ये प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांचं सुद्धा नाव जुडलं आहे, आज सकाळी रस्ता ओलांडताना त्यांचा अपघात झाल्याची घटना घडली.
चांदूर बाजारचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. एका वाहनातून दुसऱ्या वाहनात बसत असताना भरधाव दुचाकीने त्यांना उडवले. त्यांच्या डोक्याला मार लागला असल्याने अमरावती शहरातील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. शहरातील कठोरा नाका परिसरातील आराधना चौकात हा अपघात बुधवारी सकाळी घडला. अपघाताची माहिती मिळताच प्रहारचे कार्यकर्ते तसेच त्यांच्या हितचिंतकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली.
माजी राज्यमंत्री बच्चू कडू हे एका कार्यक्रमाला जाण्याकरिता अमरावतीत आले होते. कठोरा नाक्यावरील आराधना चौकात एका वाहनातून दुसऱ्या वाहनात बसण्याकरिता ते जात होते. दरम्यान भरधाव आलेल्या दुचाकीने त्यांना धडक दिली. यात ते रस्त्यावरील दुभाजकावर पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला तसेच पायाला मार लागल्याची माहिती आहे. त्यांना तातडीने येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच प्रहारचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली आहे. Bachhu kadu accident