News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर शहर महानगरपालिकेद्वारे कांजी व्यापार संकुल मार्केट येथील स्वरूप मंगल प्रसाद मिश्रा यांचे गाळा क्र.४ ए १०३८ सील करण्यात आले आहे. chandrapur municipality
Seizure Squad
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या आणि टाळाटाळ करणाऱ्या दुकानदारांचे गाळे सील करण्याची कारवाई सुरू आहे. दिनांक २४/०१/२०२३ रोजी मनपाच्या कर वसुली व जप्ती पथकाद्वारे कांजी व्यापार संकुल मार्केट येथील गाळे सील करण्यात आले. shop seal
गाळा क्र.४ ए १०३८ गाळेधारक स्वरूप मंगल प्रसाद मिश्रा यांच्याकडे रुपये एकुण ३,६३,९४८ इतकी रक्कम भाडे स्वरूपात थकीत असल्याने तसेच मालमत्ता धारकाने कर भरणा करण्यासंदर्भात नकारात्मक प्रतिसाद दिल्याने कर वसुली व जप्ती पथकाने मालमत्ता धारकाचे दुकान सील केले. या गाळ्यावर मालमत्ता कर व अन्य कर थकीत आहे.
सदर कारवाई मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात कर विभाग प्रमुख अनिल घुले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात मालमत्ता कर पथकाने केली.