News34 chandrapur
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही - ट्रकमधील गिट्टी तसेच रेतीला सुरक्षेकरिता ताडपत्री बांधणे बंधनकारक असतांनाही काही हायवा ट्रकांना ताडपत्री बांधली जात नाही. अशात अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सिंदेवाही रोडवरील दुकानदार आणि स्थानिक नागरिकांनी सदर वाहतुक थांबविण्याची मागणी केली आहे. Overload traffic
दररोज गिट्टी तसेच रेतीची वाहतूक ही रात्रंदिवस हायवा ट्रकच्या माध्यमातून केली जाते. हायवा ट्रक चालक शहरातील रहदारीच्या सिंदेवाही चौकातील रोडवरून दिवसाढवळ्या नियमबाह्यरित्या वाहतूक करीत असतात.
शहरातून जाणाऱ्या अत्यंत वर्दळीच्या रोडवरून ओव्हरलोड ट्रक नेतात. या गिट्टी तसेच रेतीचा ट्रकमुळे प्रचंड धूळ उडत असून रस्त्यावरुन चालणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनचालकांचा जीव धोक्यात आहे. ओव्हरलोड गिट्टी तसेच रेतीचा हायवा ट्रकवर ताडपत्री पुर्णतः झाकली जात नाही. त्यामुळे ट्रकमधील गिट्टी तसेच रेतीचा वाहतुकीदरम्यान रस्त्यावर रेती तसेच गिट्टी पडते. परिणामी इतर वाहन चालकाच्या अंगावर हा गिट्टी तसेच रेती पडून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नियमाची पायमल्ली करणाऱ्या हायवा ट्रक मालक व चालकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
