News34 chandrapur
चंद्रपूर/राजुरा - 40 हजार रुपयात 5 लाखांच्या नकली नोटांची विक्री करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरने अटक केली आहे.
14 जानेवारीला स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की चंद्रपूर जिल्ह्यात निखिल भोजेकर नामक इसम हा अनेक दिवसांपासून कमी किमतीत भरपूर प्रमाणात नकली नोटांचा पुरवठा करतो. Fake currency
तो चंद्रपूर जिल्ह्यात नकली नोटा आणत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती, याबाबत सापळा रचत राजुरा ते आसिफाबाद मार्गावरील रेल्वे पटरी जवळ सापळा रचण्यात आला. Chandrapur crime
त्यावेळी सहायक पोलिस निरीक्षक मंगेश भोयर व चमूने आर्टिगा वाहन क्रमांक MH46W7545 ला थांबविले असता त्यामधील वाहनांची झडती घेण्यात आली. Crime news
वाहनांमध्ये पोलिसांना 500 रुपये नोटांचे बंडल आढळले, त्यामध्ये नकली नोटा ओळखू येऊ नये यासाठी मागे-पुढे चलनातील नोटा लावण्यात आल्या होत्या. Lcb chandrapur
त्या नोटांवर चिल्डरन्स बँक असे छापील होते, नकली नोट सहित एकूण 10 लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर प्रकरणी आरोपी 24 वर्षीय निखिल हनुमान भोजेकर व 22 वर्षीय सैफुद्दीन जलाउद्दीन सैय्यद दोघेही रा. वणी जिल्हा यवतमाळ यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचेवर 420 व 34 कलम अंतर्गत गुन्हा राजुरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक मंगेश भोयर, संजय आतकुलवार, संतोष एलपूलवार, नितीन रायपूर, गोपाल आतकुलवार, रवींद्र पंधरे, कुंदनसिंग बावरी, नरेश डाहूले व प्रमोद डंभारे यांनी केली.