News34 chandrapur गुरू गुरनुले
मुल - मुल नागपूर हायवे रोडवर लागून असलेल्या वेंकटेश्वरा कॉर्पोरेशन या राईस मिलच्या सभोवताल मोठ्या प्रमाणात कचरा छोटी झाडे वाढल्याने ते सफाई करुन लेवलिंग करण्यासाठी MH-34 BV 7589 क्रमांकाची Jcb machine लावण्यात आली होती. दिनांक १० जानेवारी २०२३ रोजी दुपारी ३-३० वाजता कचरा साफ करतांना जेसीबी च्या पावड्याचा वापर करण्यात येतो. Rice mill wall collapsed
मील चे पिल्लरच्या मागच्या बाजूने कचरा साफ करते वेळी मील गोडाऊन चे पिल्लरला जेसीबी चा जोरदार धक्का बसला आणि संपूर्ण स्ट्रक्चर हलले आणि त्या भिंती सह बिमसह पूर्ण भिंतच अचानक कोसळून आत असलेले हजारो धानाचे पोते सह भिंत कोसळल्याने कॉर्पोरेशनचे फार मोठे नुकसान झाले. याबाबत मील मालकाशी संपर्क करून विचारणा केली असता जवळपास २० लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे सांगितले.
