News34 chandrapur
चंद्रपूर - 34 व्या मार्ग सुरक्षा सप्ताहानिमित्त चंद्रपूर वाहतूक शाखेने शहरातील विविध शाळेत जनजागृती मोहीम राबवित आजच्या पिढीला वाहतूक नियमांचे महत्व सांगितले. Chandrapur traffic police
शहरातील सेंट फ्रान्सिस शाळेत वाहतूक शाखेचे पोउपनी सुधीर जाधव यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती दिली. Chandrapur news
वाहतूक शाखेच्या उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापनाने आभार मानले. Road safety
त्यांनतर शहरातील मुख्य सावरकर चौकात वाहतूक शाखेच्या वतीने एकाला यमराजाच्या वेशभूषेत हातात गदा घेत हेल्मेट न घालणाऱ्या नागरिकांच्या डोक्यावर गदा ठेवली व आयुष्य एकदाच मिळते त्यासाठी सुरक्षा महत्वाची असा संदेश देण्यात आला. Traffic rules
चारचाकी वाहन चालकाना सीटबेल्ट वापरण्याचे आवाहन केले, ज्यांनी हेल्मेट परिधान केले अश्या नागरिकांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. Wear helmet
यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पाटील यांनी जिल्ह्यातील नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
यावेळी चंद्रपूर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी यांची उपस्थिती होती. Yamraj
